ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुलं सर्वाधिक अनुकरण पालकांचच करत असतात. यातून त्यांच व्यक्तिमत्व घडत असतं.
मुलांचे पालकत्व करणे, त्यांना घडवणे किंवा चांगल्या गोष्टी शिकवणे यासाठी पालकांना मेहनत घ्यावी लागते.
मुलांना चांगले संस्कार मिळावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. परंतु यासाठी पालकांना मुलांना काही चांगल्या शिकवावे.
मुलांना आभार मानायला शिकवा. कोणी मदत करत असेल किंवा काही वस्तू देत असेल तर त्यासाठी आभार मानायला शिकवा.
मुलांना राग सोडून माफ करायला शिकवा. जर त्यांच्या फ्रेंड्सकडून काही चुकी झाली असेल तर त्यांना माफ करता आलं पाहिजे.
मोठ्यांचे आदर करायला शिकवा. वयस्कर लोकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायला शिकवा.
मुलांना वेळेचे महत्व समजवा. त्यांना वेळेत काम पूर्ण करायला शिकवा. आपल्या वेळेचे नियोजन करायला शिकवा.
मुलांना लहानपणापासूनच आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखण्यास शिकवा. कचरा इकडे तिकडे न टाकता कचरापेटीत टाकायला शिकवा.
NEXT: हिवाळ्यात व्यायाम करताना अशी घ्या काळजी