ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
थंड वातावरणामुळे काही लोक आळशी होतात आणि व्यायाम करत नाही.
काही लोक जास्त थंडीमध्ये सुद्धा सकाळी व्यायाम करतात. परंतु अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
थंडीमध्ये कधीही रिकामी पोटी व्यायाम करु नये अन्यथा तुम्हाला शरीरात एनर्जीची कमतरता भासू शकते.
वॅार्म अप केल्याशिवाय व्यायाम करणे टाळा. थंडीमध्ये वॅार्म अप केल्याने शरीर गरम राहते.
काही लोक पूर्ण झोप न घेता सकाळी व्यायाम करतात. यामुळे शरीरावर अनेक परिणाम होऊ शकतात. किमान ८ तासांची झोप घ्या.
हिवाळ्यात अनेक जण पाणी कमी पितात पण यामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. यामुळे व्यायामावेळी चक्कर येऊ शकते.
थंडीमुळे त्वचा ड्राय होते आणि फाटते. त्यामुळे मॅाइश्चराइजर आणि लिप बाम लावा.
व्यायाम करत असाल तर डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करा. हिरव्या भाज्या, फळे आणि ड्राय फ्रुट्चा समावेश करा.
NEXT: महाराष्ट्रातील 'या' मंदिरांना भेट देऊन नवीन वर्षाची करा मंगलमय सुरुवात