Amravati Crime News : पीक रखवालीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची हत्या; नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा

Amravati News : सुनील सोळंके हे रात्री शेतात हरभरा पिकाची राखण करण्यासाठी गेले होते. मात्र सकाळी शेतकरी व शेतमजुर शेतात गेले असताना त्यांना सोळंके रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्यानंतर हि घटना उघडकीस आली
Amravati Crime News
Amravati Crime NewsSaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : शेतात पिकाची रखवाली करायला गेलेल्या आदिवासी शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. भातकुली तालुक्यातील गोपगव्हान येथे सदरची घटना घातली असून आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातलगांनी दिला आहे. 

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील गोपगव्हाण शेतशिवारात हि घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान शेतात लागवड केलेल्या हरभरा पिकाच्या रखवाली करण्यासाठी पारधी आदिवासी शेतकरी सुनील सोळंके (वय ३५) यांचा अज्ञात व्यक्तींनी गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून केला आहे. 

Amravati Crime News
Nandurbar Red Chilli Market : नंदुरबार बाजार समितीत ओली लाल मिरचीची आवक तेजीत

शेतकरी शेतात गेल्यानंतर घटना उघड 

सुनील सोळंके हे रात्री शेतात हरभरा पिकाची राखण करण्यासाठी गेले होते. मात्र सकाळी शेतकरी व शेतमजुर शेतात गेले असताना त्यांना सुनील सोळंके हे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्यानंतर हि घटना उघडकीस आली. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. 

Amravati Crime News
Malegaon News : बनावट दारू कारखाना उध्वस्त; ४ जण ताब्यात, मालेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नातेवाईक संतप्त 

दरम्यान धारदार हत्याराचा वापर झाल्याने ही हत्या अत्यंत निर्दयी पद्धतीने झाल्याचे स्पष्ट होते. मृतकाची पत्नी पंचायत सदस्य असून, या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. सदरच्या घटनेनंतर नातेवाईक संतप्त होत आक्रमक झाले आहे. आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने नातेवाईक व गावकरी जमले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com