Satish Wagh Case Update : वाघ हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, कट रचणारा सूत्रधारच सापडला

Satish Wagh News : सतीश वाघ खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणाचा कट रचणारा सूत्रधारच सापडला आहे.
वाघ हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, कट रचणारा सूत्रधारच सापडला
Satish Wagh Case Update Saam v
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणाचा नवा ट्विस्ट समोर आला आहे. सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधारच सापडला आहे. सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहणाराच व्यक्ती खुनाचा मुख्य सूत्रधार निघाला आहे. पूर्व वैमनस्यातून सतीश वाघ यांची हत्या झाल्याचे समोर आलं आहे. पूर्व वैमनस्यातून त्यांची हत्या झाल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

वाघ हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, कट रचणारा सूत्रधारच सापडला
Shahada Crime : लग्न समारंभातून ७ लाखांचे दागिने चोरी; मध्य प्रदेशच्या सासी गँगमधील तिघेजण ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडकरू राहणारा व्यक्ती मुख्य सूत्रधार निघाला आहे. त्याने पूर्व वैमनस्यातून वाघ यांची हत्या झाल्याची कबुली दिली. मागील ४ ते ५ महिन्यांपासून वाघ यांच्या खुनाची आरोपींकडून कट रचला जात होता. अक्षय जावळकर असे भाडेकरूचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याआधी पुणे पोलिसांनी पवन शर्मा आणि नवनाथ अर्जुन गुरसाळे यांना अटक केली आहे.

वाघ हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, कट रचणारा सूत्रधारच सापडला
Chandrapur Crime News : निलंबित पोलिसाने केला वर्ग मैत्रिणीचा खून; कॉल रेकॉर्डवरून लागला शोध

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी भाडेकरू म्हणून राहणारा अक्षय जावळकर आणि सतीश वाघ यांचे वैमनस्याचे संबंध होते. या दोघांमध्ये वितुष्ट होते. या कारणावरून अक्षय जवळकर याने मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी सतीश वाघ यांना ठार मारण्याची सुपारी पवन शर्मा याला दिलेली होती. मागील चार ते पाच दिवसांपूर्वी पवन शर्मा याने त्यांचे साथीदार नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे आणि इतरांनी कट रचला. तसेच अक्षय जावळकर यांच्याकडून आगाऊ रक्कम देखील स्वीकारली आहे. सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले असताना ठरल्याप्रमाणे आरोपींनी आधी त्यांचे अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची हत्या केली.

वाघ हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, कट रचणारा सूत्रधारच सापडला
Cyber Crime : वृध्द महिलेची साडे पंधरा लाखाची फसवणूक; सीबीआय व कस्टम अधिकारी असल्याचे सांगत केला बनाव

अपहरणानंतर नेमकं काय घडलं?

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं. अपहणानंतर सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर धावत्या गाडीतच हत्या करण्यात आली आहे. धावत्या गाडीत हत्या केल्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात फेकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अपहरण केल्यानंतर धावत्या गाडीतच त्यांचा तीक्ष्ण शस्त्राने आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून आणि गळा दाबून सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा या २ जणांना अटक केली आहे. सतीश वाघ यांच्या अपहरण आणि खून प्रकरणात पाच आरोपी असल्याचे प्राथमिक माहिती समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com