
अहमदाबाद: (Gujrat serial killer) गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नुकतेच साणंद परिसरात एका व्यावसायिकाची हत्या करण्यापूर्वी पोलिसांनी एका तांत्रिकाला पकडले होते. रविवारी सकाळी तांत्रिकाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. एका टॅक्सी चालकाकडे रात्री तांत्रिक म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील तीन लोकांसह एकूण 12 जणांची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
रसायन युक्त पेय पाजून त्याने या हत्त्या केल्याची कबूली दिली होती. या तांत्रिकाने साणंद येथील व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात अडकवले होते. तांत्रिक विद्याच्या माध्यमातून चौपट रक्कम देऊ, असे आश्वासन त्याने दिले होते, मात्र तांत्रिकाने व्यावसायिकाची हत्या करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.
42 वर्षीय नवलसिंग चावडा हा पाणी आणि दारूमध्ये सोडियम नायट्रेट मिसळत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अहमदाबाद पोलिसांचे डीसीपी झोन-7 शिवम वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला 1 डिसेंबर रोजी पकडण्यात आले. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता 10 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
रविवारी सकाळी त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर त्यांना सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. वर्मा म्हणाले की, आरोपीने एकूण 12 जणांची हत्त्या केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये त्याने अहमदाबादमध्ये एक तर सुरेंद्र नगरमध्ये सहा जणांची हत्त्या केली. यामध्ये त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे. त्याने आई, पत्नी आणि काकांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरियल किलरने राजकोटमध्ये तीन तर कच्छच्या वांकानेर आणि अंजारमध्ये प्रत्येकी एक हत्त्या केली.
मित्राने केला तात्रिकाचा भांडाफोड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चावडा हा कॅब सेवा चालवायचा. यासह त्याने एक यूट्यूब चॅनेल तयार केले होते. यामध्ये ते तंत्रविद्या सांगायचा. त्याने साणंदमधील एका व्यावसायिकाला मारण्याची योजना आखली होती, परंतु कॅब सेवेतील पीडित जिगर गोहिल आणि त्याचा सहकारी यांच्यामुळे तो पकडला गेला. नवलसिंग चावडा याने त्याला सरखेज पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले होते, असे पोलिसांनी सांगितले.
सीरियल किलर बनलेल्या या कथित तांत्रिकाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी लॉकअप फुटेज ताब्यात घेतले आहे. कथित तांत्रिक नवल सिंग चावडा याने 13 व्या हत्येसाठी अभिजीत सिंग राजपूत याला लक्ष्य केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवल सिंग चावडा याने गेल्या 13 वर्षात हे खून केले होते. सोडियम नायट्रेटमुळे पीडितेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे उघड झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.