Pune Crime : पुणे हादरले! घराबाहेर खेळता खेळता चिमुकल्या बहिणी गायब, शहराबाहेर ड्रममध्ये मृतदेह आढळले

Pune Rajgurunagar Crime News : राजगुरूनगरमध्ये दोन बहिणींचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. दोन सख्या बहिणी घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाल्य होत्या. रात्री त्यांचा मृतदेह आढळला.
Scene of crime in Rajgurunagar where two young girls were found murdered
Pune Rajgurunagar Pune murder case
Published On

रोहिदास गाडगे, साम टीव्ही प्रतिनिधी

Pune Rajgurunagar Pune murder case : पुण्यातून मनाला हादरा देणारी घटना समोर आली आहे. राजगुरूनगरमध्ये दोन मुलींची निर्घृण हत्या करण्यात आली. दुपारी मुली घराबाहेर खेळत होत्या, त्यावेळी त्या बेपत्ता झाल्या. पालकांनी शोधाशोध केली, पण काही केल्या पोटच्या पोरी सापडल्या नाहीत. रात्री शहराबाहेर एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलीचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

राजगुरुनगर शहरातून काल दुपारी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्या मुलींचे मृतदेह छिन्नविछिन्न आवस्थेत आढळले. चिमुकल्या मुलींची नावे दुर्वा मकवाने आणि कार्तिकी मकवाने अशी आहेत. मुलीसोबत लैंगिक अत्याचार झालेत का? हत्या झाली असेल तर कोणत्या कारणामुळे केली? याचा तपास पोलीस करत आहेत. चिमुकल्या मुलीच्या हत्येनं राजगुरूनगर हादरले आहे.

Scene of crime in Rajgurunagar where two young girls were found murdered
Kalyan Crime: दुकानावर गेली पण परत आलीच नाही, १३ वर्षांच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; कल्याण हादरले

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. पालकांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी तिचा शोध घेतला. शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहराजवळ असलेल्या एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. राजगुरुनगर पोलीसांनी दोन्ही मुलीचे मृतदेह शवच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून बेपत्ता झालेल्या या दोन मुलींसोबत काय झाले? याचा तपास पोलीस करत आहेत.

Scene of crime in Rajgurunagar where two young girls were found murdered
Kalyan Crime: कल्याणमध्ये मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, आरोपीला बायकोनंच केली मदत

विद्यार्थींनीचा हृदयविकाराने मृत्यु

राजगुरुनगर येथे महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थींनीचा हृदयविकाराने मृत्यु झाल्याची घटना बुधवारी घडली. शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमात अस्वस्थ वाटतं असल्याने चक्कर आली, यावेळी शिक्षकांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच विद्यार्थींनीचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्नेहा एकनाथ होले असे विद्यार्थींनीचे नाव असून लहान वयातील शाळकरी मुलीच्या मृत्युमुळे राजगुरुनगर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com