Nilesh Ghaiwal  x
मुंबई/पुणे

Pune Crime: निलेश घायवळ अन् टोळीला पोलिसांचा मोठा दणका; १० बँक खाती गोठवली, प्रॉपर्टीसुद्धा सील

Nilesh Ghaiwal: पुण्यातील गुंड निलेश घायवळला पोलिसांनी मोठा दणका दिला. पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांची १० बँक खाती गोठवली आहेत. तसंच त्यांची प्रॉपर्टी देखील जप्त करण्यात आली आहे.

Priya More

Summary -

  • कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळवर पोलिसांची मोठी कारवाई केली.

  • निलेश घायवळ आणि कुटुंबीयांची १० बँक खाती पोलिसांनी गोठवली.

  • खात्यांमध्ये तब्बल ३८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • घायवळ टोळीवर मकोका लावून प्रॉपर्टी सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अक्षय बडवे, पुणे

कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळला पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. निलेश घायवळचे बँक खाते गोठवण्यात आली आहेत. तसंच त्याची मालमत्ता देखील सील करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश घायवळ लंडनला पळून गेला. तो सध्या स्विझर्लंडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. घायवळच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पुणे पोलिसांनी त्याला लंडनवरून रिटर्न येण्याचे वांदे केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळ आणि त्याच्या संबंधित व्यक्तींचे बँक खाते आता पुणे पोलिसांनी गोठवले आहेत. लुक आऊट नोटीस जारी केल्यानंतर घायवळविरोधात पोलिसांकडून आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. निलेश घायवळसह त्याच्या कुटुंबीयांची एकूण १० बँक खाती आहेत. ही सर्व खाती गोठवण्यात आली आहेत. या १० खात्यांमध्ये ३८ लाख रुपये आहेत.

पुणे पोलिसांकडून आता घायवळ कुटुंबाची आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची मालमत्ता सील करण्याची प्रकिया लवकरच सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे. या टोळीतील सदस्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण १० खाती गोठवण्यात आल्यामुळे त्यांना चांगलाच दणका बसला आहे. या माध्यमातून पोलिसांनी गुन्हेगारी टोळीच्या आर्थिक स्रोतांवरच घाव घातला आहे. सध्या पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या प्रकरणी १० जणांवर मकोका लावण्यात आला आहे.

कोथरूड परिसरात काही दिवसांपूर्वी घायवळ टोळीने राडा केला होता. या टोळीतील गुंडांनी दोन व्यक्तींवर हल्ला केला होता. एका व्यक्तीवर गोळीबार तर दुसऱ्या व्यक्तीवर चाकूने हल्ला केला होता. या घटनेत दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर दोन गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यांमध्ये निलेश घायवळचा देखील संबंध असल्यामुळे पोलिसांनी त्याला आरोपी करत गुन्हा दाखल केला तेव्हापासून निलेश घायवळ फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राजभवनात 'मोदीज मिशन' पुस्तकाचं प्रकाशन

Satara News : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई

Papad Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? मग कुरकुरीत पापडापासून बनवा 'हा' पदार्थ

Friday Horoscope: शुक्रवारची सुरुवात धमाकेदार बातमीने होईल, हाती आलेला पैसा जाण्याची शक्यता; वाचा राशीभविष्य

Heart Disease: कमी झोपेमुळे तुम्हीच देताय हार्ट अटॅकला आमंत्रण, ह्रदयाचे आणि झोपेचे नाते काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT