Nilesh Ghaiwal : मकोका कारवाई, निलेश घायवळ लंडनला पळाला; पासपोर्टसाठी कुणी केली मदत? कुठे आहे नवं घर?

Nilesh Ghaiwal Passport : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पळाल्याची माहिती समोर आली. त्याने अहिल्यानगरमधील घराचा पत्ता वापरुन पासपोर्ट बनवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nilesh Ghaiwal
Nilesh Ghaiwal x
Published On
Summary
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पळाल्याची माहिती समोर आली.

  • पासपोर्टसाठी त्याने नगरमधील बनावट पत्ता वापरल्याचा धक्कादायक खुलासा झाला.

  • पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून तपास वेगाने सुरू आहे.

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : पुण्याच्या कोथरुड भागातील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या टोळीतील सदस्यांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलीस निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीतील सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करत आहेत. टोळीतील ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यादरम्यान निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान पोलिसांना घायवळ संबंधित महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनला पसार झालेला गुंड निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील पत्ता दिल्याचे समोर आले आहे. पुण्यात निलेश घायवळवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे पुण्यात पासपोर्ट मिळण्यास अडचण येऊ शकते हे तो ओळखून होता. पासपोर्टसाठी त्याने नगरमधील बनावट पत्त्याचा वापर केला.

Nilesh Ghaiwal
Amrut Bharat Express : दसऱ्यापूर्वीच भारतीय रेल्वेचं मोठं गिफ्ट! महाराष्ट्रातून धावली नवी अमृत भारत ट्रेन, कुठे-कुठे थांबणार?

अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड हा पत्ता घायवळने पासपोर्ट तयार करण्यासाठी वापरला होता. आता अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी निलेश घायवळचा गुन्हेगारीचा इतिहास न तपासताच त्याला पासपोर्टसाठी संमती कशी दिली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Nilesh Ghaiwal
Red Alert : पुढचे काही तास महत्त्वाचे! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', अतिजोरदार पाऊस कोसळणार

निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीची पुण्यात दहशत असल्याचे म्हटले जाते. हत्या, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे त्यांच्या नावावर आहेत. मकोकाची कारवा होत असताना तो परदेशी, लंडनला पळून गेला. आता निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला आणि तो परदेशी कसा पळून गेला याचा तपास पोलीस करत आहेत.

Nilesh Ghaiwal
Election : महानगरपालिका निवडणुकासंदर्भात मोठी अपडेट, 'स्थानिक'नंतर मनपा निवडणुकीचा बार उडणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com