Red Alert : पुढचे काही तास महत्त्वाचे! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', अतिजोरदार पाऊस कोसळणार

Red Alert In Mumbai : मुंबई शहर, उपनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी (२८ सप्टेंबर) दिवसभर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
Red Alert
Red Alertx
Published On
Summary
  • मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

  • रविवारी दिवसभर अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाने मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानुसार, रविवारी (२८ सप्टेंबर) मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आधीच या भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आता रविवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना सावधगिरीचा सल्ला हवामाना विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरासह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह नाशिकच्या घाटमाथ्यावरही पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिसरात विजेच्या कडकडाटांसह पाऊस पडणे अपेक्षित आहे.

Red Alert
Digital Payment होणार सोपं आणि सुरक्षित! OTP व्यतिरिक्त फिंगरप्रिंट आणि पासवर्डनेही होणार व्यवहार

शनिवारी (२७ सप्टेंबर) हवामान विभागाने नवी माहिती दिली. माहितीनुसार, किनारपट्टी आणि उत्तर कोकणाच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत रविवारी कमी तीव्रतेचा पाऊस पडेल. या भागात पाऊस हलका किंवा मध्यम स्वरूपाचा असेल. शनिवारी सकाळी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. दिवसभर आकाश ढगाळ राहिले आणि काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या.

Red Alert
Amrut Bharat Express : दसऱ्यापूर्वीच भारतीय रेल्वेचं मोठं गिफ्ट! महाराष्ट्रातून धावली नवी अमृत भारत ट्रेन, कुठे-कुठे थांबणार?

मागील २४ तासांमध्ये सकाळी ८ वाजेपर्यंत किनारपट्टी परिसरात ३०.०७ मिमी, पूर्व उपनगरात २६.१२ मिमी आणि पश्चिम उपनगरात ९.९९ मिमी पावसाची नोंद झाली. रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होती. पण पावसामुळे लोकल ट्रेन सेवांना काही प्रमाणात विलंब सहन करावा लागला. नागरिकांनी रेड अलर्ट दरम्यान सावध राहावे अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत.

Red Alert
Election : महानगरपालिका निवडणुकासंदर्भात मोठी अपडेट, 'स्थानिक'नंतर मनपा निवडणुकीचा बार उडणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com