Pune police raid today Saam TV marathi
मुंबई/पुणे

Pune : रात्री १२ ते पहाटे ३, झडती आणि नाकाबंदी! पुणे पोलिसांचे बुधवार पेठेत कॉम्बिंग ऑपरेशन

Budhwar Peth Pune latest news : पुण्यातील बुधवार पेठेत मध्यरात्री १२ ते पहाटे ३ दरम्यान पोलिसांनी मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. ५० हून अधिक घरांची झडती, नाकाबंदी आणि अमली पदार्थ तसेच बेकायदा कारवायांच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.

Akshay Badve

Pune police midnight combing operation in Budhwar Peth details : मध्यरात्री १२ ते पहाटे ३ वाजता पुण्यातील बुधवार पेठेतील अनेक घरांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. कुंटणखान्यातील अनेकांची झाडाझडती घेण्यात आली. अमली पदार्थांसह, जबरदस्तीने अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय या ऑपरेशनचा मुख्य हेतू आहे. बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्ली बाहेर नाकाबंदी तर ५० पेक्षा अधिक घरांची झडती घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. बांगलादेशी तरुणीबाबतची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली नाही तसेच तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप ठेवत या महिला कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले होते.

या घटनेनंतर पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ अशा घटना थांबल्या पाहिजेत यासाठी बुधवारी मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे ठरवले. यानुसार, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध युनिट चे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रात्री १२ वाजता मोठा फौजफाटा बुधवार पेठेत दाखल झाला. बुधवार पेठेत येणारे आणि जाणारे सर्व रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली.

शुक्रवार पेठ पोलिस चौकी जवळ असलेल्या सर्व कुंटणखान्यातील महिलांची महिला पोलिसांनी चौकशी केली. तसेच या ठिकाणी वावरत असलेल्या अनेक तरुणांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. अमली पदार्थ तसेच जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करायला भाग पाडणे, बांगलादेशी महिलांचे बेकायदा वास्तव्य या अनुषंगाने पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना फुटणार याची कुणकुण मला होती, पण... ; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Weather Update: धडकी भरवणारं ७० किमी वेगाचं वादळ अन् मुसळधार पाऊस; २० राज्यांसाठी IMD चा अलर्ट

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्ण महिलेच्या विनयभंगप्रकरणी डॉक्टर अटकेत

Bhootam Bhayyam: सात मित्रांच्या आयुष्यात घडणार रहस्यमयी घटना; ऑरेंज ज्यूस गँगच्या 'भूतम भयम्'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

देवदर्शन करून परतताना भविकांवर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, मृतांची नावं आली समोर

SCROLL FOR NEXT