Pune Police Attack Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police Attack: जिगरबाज पठ्ठ्या! 'सर लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचंय', कोयता हल्ल्यातील जखमी APIने दाखवली हिंमत

Pune Police Attack News Latest Update: वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर निहालसिंग टाकने कोयत्याने हल्ला केला होता. यात गायकवाड जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gangappa Pujari

अक्षय बडवे| पुणे, ता. २६ ऑगस्ट २०२४

पुणे शहरातील गुन्हेगारीने कळस गाठला असून काल थेट पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामध्ये रत्नदीप गायकवाड हे सहायक पोलीस निरीक्षक जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून रुग्णालयात उपचार सुरू असतानाही सर मला लवकर बरं व्हायचं आहे त्यांना पकडायच आहे, असे म्हणत गायकवाड यांनी आपल्या जिगरबाज वृत्तीचे दर्शन दिले.

जखमी पोलीस अधिकाऱ्यावर उपचार सुरु

पुणे शहरात एका पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. काल संध्याकाळी ससाणे नगर भागात सुरू असलेले भांडण सोडवायला गेलेल्या वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर निहालसिंग टाक नावाच्या तरुणाने कोयत्याने हल्ला केला होता. यात गायकवाड जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस आयुक्तांनी घेतली भेट

याप्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या प्रकरणी जातीने लक्ष घातले होते. तसेच आयुक्त अमितेश कुमार यांनी रत्नदीप गायकवाड यांची रुग्णालयात भेट घेत तब्बेतीची विचारपूस केली होती. यावेळी जखमी अवस्थेतेही रत्नदीप गायकवाड यांनी सर लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचयं, असे म्हणत आपल्या जिगरबाज वृत्तीचे दर्शन दिले. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे.

दरम्यान, पुण्यात काल २ तरुणांनी वानवडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला. ही घटना घडताच पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली होती. या मध्ये सोलापूर पोलिसांची मदत घेण्यात आली आणि त्यांना वरवडे टोल नाकावरून ताब्यात घेण्यात आले. निहाल सिंह टाक आणि त्याच्या मित्राला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोघांवर याआधी ते अल्पवयीन असताना अनेक गुन्हे दाखल आहेत आणि आता इथून पुढे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT