Pune News: धक्कादायक! पुण्यात 'सर तन से जुदा' करणाऱ्या घोषणा; ३०० जणांवर गुन्हा दाखल

Pune Latest News: समाजामध्ये सार्वजनिक शांततेचा भंग होऊन असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी पुण्यात 300 जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
Pune News: धक्कादायक! पुण्यात 'सर तन से जुदा' करणाऱ्या घोषणा; ३०० जणांवर गुन्हा दाखल
Pune Latest News:Saamtv
Published On

अक्षय बडवे, पुणे|ता. २५ ऑगस्ट २०२४

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "सर तन से जुदा" करणाऱ्या घोषणा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हा प्रकार घडला असून समाजामध्ये सार्वजनिक शांततेचा भंग होऊन असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी पुण्यात 300 जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा राज्यभरात निषेध केला जात आहे. रामगिरी महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वधर्म समभाव महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही ठराविक लोकांनी "सर तन से जुदा" तसेच टिपू सुलतान समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवुन विनापरवानगी मोर्चा काढून, मोर्चामध्ये बेकायदेशीरपणे सामील होऊन, त्यांना दिलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे नोटीसचे उल्लंघन केल्यामुळे २०० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: धक्कादायक! पुण्यात 'सर तन से जुदा' करणाऱ्या घोषणा; ३०० जणांवर गुन्हा दाखल
Maharashtra Politics: मोठी बातमी! आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, स्वागताचे फ्लेक्सही झळकवले; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

दरम्यान, सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यानंतर राज्यभरातील मुस्लिम बांधवांनी संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदगरसह पुण्यातही गुन्हे दाखल झाले आहेत

Pune News: धक्कादायक! पुण्यात 'सर तन से जुदा' करणाऱ्या घोषणा; ३०० जणांवर गुन्हा दाखल
PM Modi Speech : 'पोलंडमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले', PM मोदींनी सांगितला परदेश दौऱ्याचा किस्सा; नेमके काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com