Shivsena Leader Arrested By Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Political News: मोठी बातमी! शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Shivsena Leader Arrested By Pune Police: पुण्यामध्ये शिवसेना शिंदेगटाच्या बड्या नेत्याला पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Priya More
  • शिंदेसेनेचा नेत्याला पुण्यातून अटक

  • तुषार हंबीर याला पुण्यातील फुरसुंगीतून परिसरातून अटक केली

  • अपहरण आणि खंडणी प्रकरणात शिंदेसेनेच्या नेत्याला अटक

सागर आव्हाड, पुणे

पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत शिंदेसेनेच्या नेत्याला अटक केली. पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटात प्रमुख पदावर असलेला तुषार हंबीरला पुणे पोलिसांनी अटक केली. फुरसुंगी परिसरातून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मोक्काअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात तुषार हंबीर गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. या कारवाईमुळे पुण्यातील राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि खंडणीच्या गंभीर गुन्ह्यात मोक्का कारवाई झाल्यानंतर फरार असलेल्या शिंदेसेनेच्या नेत्याला अटक करण्यात आली. तुषार नामदेव हंबीर (वय ४०) असं या शिवसेना नेत्याचे नाव आहे. तो हडपसर येथा राहतो. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या. २४ ऑक्टोबर रोजी फुरसुंगी परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.

राजगड परिसरातील एका व्यावसायिकाच्या मुलाचे कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्यावरून अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी कार आडवी घालत तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. तसेच पिस्तुलाची नळी तोंडात घालून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये मोक्क्यासह विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या गुन्ह्यानंतर शिवसेना नेता तुषार हंबीर फरार होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी तो वारंवार राहण्याची ठिकाणे आणि मोबाईल सिमकार्ड बदलत होता. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला फुरसुंगीतून अटक केली. हंबीर याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा आणि आर्म्स ॲक्टसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : सारसबागजवळ बंद कारमध्ये आढळला कुजलेला मृतदेह, २५ वर्षाच्या तरूणासोबत नेमकं काय झालं?

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

'नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी'; लावणीसम्राज्ञी विठाबाईंची कहाणी मोठ्या पडद्यावर; 'ईठा'चा शानदार ट्रेलर प्रदर्शित

Water Bottle Designs Secrets: पाण्याच्या बाटल्यांवर नागमोडी रेषा का असतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सुका चारा अन् मुरघासाचे दर निश्चित

SCROLL FOR NEXT