महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार; शिंदेंची शिवसेना फुटणार, कोणी केला दावा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदेंची शिवसेना फोडणार असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसच्या नेत्यानं केला आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील घटकपक्ष भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका-प्रतिटीका आणि आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महायुती फुटणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, शिंदेंची शिवसेना फोडण्यात येणार असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, महाराष्ट्रात पुन्हा एकदा ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यात आली होती. त्यानंतर महायुती करण्यात आली होती. त्या महायुतीची 'महाफोड' होणार आहे अशी माहिती मिळत आहे. आता शिंदेसेनाही फोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात वॉर सुरू आहे. महाराष्ट्र यात अडकला आहे. दुष्काळाचा सामना करणारा शेतकरी यात पिसला जात आहे, असेही लोंढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.