Pune PMPML to Launch Open Gallery Bus Saam
मुंबई/पुणे

पुण्यात अनुभवा लंडनचा Feel! रस्त्यावर धावणार 'ओपन गॅलरी बस', कधीपासून सुविधा सुरू होणार?

Pune PMPML to Launch Open Gallery Bus: पुणेकरांना लवकरच मिळणार लंडन न्यूयॉर्कसारखा फिल. 'ओपन गॅलरी बस' लवकरच सुरू होणार.

Bhagyashree Kamble

  • पुण्यात लवकरच ओपन गॅलरी बस सेवा सुरू होणार

  • खुल्या छतावरून रहिवाशांना शहरदर्शन करता येणार

  • या खास सेवेमुळे पर्यटनाला चालना मिळणार

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता लवकरच पुणेकरांना लंडनसारखा फिल घेता येणार आहे. लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या आंतरराष्ट्रीय शहारांच्या धर्तीवर पुण्यात 'ओपन गॅलरी बस' सेवा सुरू होणार आहे. या नव्या उपक्रमामुळे पुण्यातील पर्यटनाला नवीन चालना मिळणार आहे. तसेच पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे.

'ओपन गॅलरी बस' ची संकल्पना पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी पुढे आणली असून, या बसला 'मेक इन पीएमपीएमएल', असे नाव देण्यात आले आहे. या बसमधून प्रवाशांना पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, जुन्या स्थापत्यशैलीतील इमारती, सांस्कृतिक केंद्रे तसेच शहराचे बदलते रूप जवळून अनुभवता येणार आहे.

परदेशांमध्ये 'ओपन गॅलरी बस'ला विशेष लोकप्रियता आहे. न्यूयॉर्क, लंडनसारख्या ठिकाणी या प्रकारच्या बसेस रस्त्यावर धावतात. दरम्यान, पीएमपीएलकडून पुण्यातही अशी सेवा सुरू करण्याची तयारी आहे. दरम्यान, काही अडचणी देखील आहेत. या अडचणींवर तोडगा निघाल्यानंतर ही बससेवा लवकरच सुरू करण्यात येईल.

तारा अन् झाडांची व्यवस्था

'ओपन गॅलरी बस' चालवताना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. शहरातील काही रस्त्यांवर विद्युत तारा खाली आल्याचं पाहायला मिळतं. तसेच काही ठिकाणी झाडांच्या फांद्या बसच्या मार्गावर येतात. किंवा बसच्या टपावर पडतात. यासाठी ही बससेवा सुरू कऱण्यापूर्वी नियोजित मार्गाची पाहणी करायला हवी. तसेच मार्गावर येणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि विद्युत तार महावितरणने वेळीच हटवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवके यांनी सांगितलं की, 'पीएमपीएमएल दरवर्षी उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून, परदेशात ज्याप्रमाणे 'ओपन गॅलरी बस' धावते, त्याचप्रमाणे एका खास बस तयार करण्यात येणार आहे. या बसच्या छतावर बसून रहिवाशांना शहराचे सौंदर्य अनुभवता येईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elon Musk: 'माझी पार्टनर आर्धी भारतीय, मुलाचं नाव ठेवलं शेखर'; एलन मस्क यांचा खुलासा

पोलिसांनीच आरोपीला हत्येसाठी पाठवलं? गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप, सक्षम ताटे प्रकरणाला नवं वळण|VIDEO

Soap Care: साबणाच्या डब्यातही साबण वितळतोय? वापरा या 5 सोप्या ट्रिक्स; साबण कधीच वितळणार नाही

कल्याण-डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग; ठाकरेंना हादरा बसणार, काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Cyber Attack: भारतातील प्रमुख विमानतळांवर सायबर अटॅक; विमानांचा डेटा लीक करण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT