निर्घृण हत्या अन् खांबाला बांधलं; तरूणासोबत मध्यरात्री नेमकं काय घडलं? कोल्हापूर हादरलं

Kolhapur Man Found Dead with Wire Around Neck: विश्व पंढरी ते हॉकी स्टेडियमदरम्यानच्या रस्त्याजवळील एका खांबाला बांधलेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला. परिसरात खळबळ.
Kolhapur Man Found Dead with Wire Around Neck
Kolhapur Man Found Dead with Wire Around NeckSaam Tv Marathi
Published On

कोल्हापुरातून खळबळजनक बातमी उघडकीस आली आहे. विश्वपंढरी ते हॉकी स्टेडियम रोड येथे मध्यरात्री तरुणाची हत्या करण्यात आली. रस्त्यालगत असलेल्या खांबाला बांधलेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळून आला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलिसांकडून मृत तरूणाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्व पंढरी ते हॉकी स्टेडियमदरम्यानच्या रस्त्यालगत एका खांबाला बांधलेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला. मध्यरात्रीच्या सुमारास ३० ते ३५ वयोगटातील तरूणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉकी स्टेडियमच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरील एका खांबाला टेकून एक तरूण बसला असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आले.

Kolhapur Man Found Dead with Wire Around Neck
'आंचल माझी मुलगी नाही तर..' लेकाच्या मृत्यूनंतर सक्षमची आई काय म्हणाली? गुणरत्न सदावर्तेंकडे केली मोठी मागणी

परिसरातील नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले. तेव्हा तरूणाच्या गळ्याभोवती वायर गुंडाळलेली दिसली. तसेच तो मृत अवस्थेत असल्याचं आढळून आलं. प्रत्यक्षदर्शींनी तातडीनी याबाबतची माहिती राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण लोंढे आणि डीबी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Kolhapur Man Found Dead with Wire Around Neck
लग्नात चिमुकलीवर नराधमाची घाणेरडी नजर; उसाच्या शेतात नेत अत्याचाराचा प्रयत्न, कोल्हापूर हादरलं

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तसेच रूग्णालयात पाठवले. पोलिसांनी मृतदेहाजवळ काही पुरावे आहेत का? याचा शोध घेतला. मात्र, पोलिसांना मृतदेहाजवळ ना फोन ना कोणती कागदपत्रे सापडली. सध्या पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हा तरूण नेमका कोण आहे? तरूणाची निर्घृण हत्या का करण्यात आली? हत्या करण्यामागचं कारण काय? तरूणाला खांबाला बांधून का ठेवलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Kolhapur Man Found Dead with Wire Around Neck
लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा, लवकरच नवी योजना सुरु करणार; महिलांमध्ये आनंदाचं वातावरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com