लग्नात चिमुकलीवर नराधमाची घाणेरडी नजर; उसाच्या शेतात नेत अत्याचाराचा प्रयत्न, कोल्हापूर हादरलं

Kolhapur Shaken After Attempted Assault on Minor Girl: कोल्हापूरच्या कात्यायनी ते गिरगाव रस्त्यावरील उसाच्या शेतात भयंकर घडलं. चिमुकलीवर नराधमाची वाईट नजर. उसाच्या शेतात अत्याचाराचा प्रयत्न.
Kolhapur Shaken After Attempted Assault on Minor Gir
Kolhapur Shaken After Attempted Assault on Minor GirSaam Tv News
Published On
Summary
  • कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न

  • कात्यायनी ते गिरगाव दरम्यान रस्त्यावरील उसाच्या शेतात नराधमाचं कृत्य

  • मुलीने आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापुरात जादूटोणा आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच कात्यायनी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका चिमुकलीला उसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुलीनं आरडाओरड केल्यानं मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. कोल्हापुरातील कात्यायनी ते गिरगाव दरम्यान रस्त्यावरील उसाच्या शेतात हे भयंकर प्रकरण उघडकीस आलं. विकास कांबळे (वय वर्ष २८)असे नराधमाचे नाव आहे.

घटनेच्या दिवशी चिमुकली आईसोबत नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती. लग्नात नराधमाची नजर चिमुरडीवर पडली. त्यानं तिला कात्यायनी ते गिरगाव दरम्यान रस्त्यावरील उसाच्या शेतात नेलं. तसेच तिथं चिमुकलीवर जबरदस्ती केली. अत्याचाराचा प्रयत्न करत असताना चिमुकलीनं त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला.

Kolhapur Shaken After Attempted Assault on Minor Gir
पुणे हादरलं! पुरूषाचं विवाहित स्त्रीसोबत अनैतिक संबंध; लग्नासाठी हट्ट करताच जिवंत जाळलं, शेवटी पुरावा मागे सुटला

मात्र, आरोपीनं तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. याच दरम्यान, चिमुरडी जोरजोरात ओरडली. मुलीनं आरडाओरड केल्यानं मोठा अनर्थ टळला. स्थानिकांनी तातडीने उसाच्या दिशेनं धाव घेतली. तसेच चिमुकलीची नराधमाच्या तावडीतून सुटका केली. या घटनेनंतर इस्पुरली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी विकास कांबळेला ताब्यात घेतलं.

Kolhapur Shaken After Attempted Assault on Minor Gir
'आंचल माझी मुलगी नाही तर..' लेकाच्या मृत्यूनंतर सक्षमची आई काय म्हणाली? गुणरत्न सदावर्तेंकडे केली मोठी मागणी

या घटनेनंतर चिमुकली प्रचंड घाबरली. चिमुकलीच्या आईनंही आरोपीविरोधात संताप व्यक्त केला. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com