PMC News  x
मुंबई/पुणे

Pune : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार, बोनससह सानुग्रह अनुदानात वाढ

Pune PMC News : पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळीच्या मुहूर्तावर बोनस मिळणार आहे. बोनसप्रमाणे त्यांना २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

Yash Shirke

  • पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

  • बोनस व्यतिरिक्त सानुग्रह अनुदानात दोन हजाराची वाढ

  • ही रक्कम दिवाळी पूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune City News : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीपूर्वी पुणे महापालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात वाढ झाली आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळीच्या मुहूर्तावर ८.३३ टक्के बोनस मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. ही रक्कम दिवाळी पूर्वीच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानामध्ये दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यांना दिवाळी बोनससह २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. यंदाच्या वर्षी सानुग्रह अनुदानाच्या रकमेत दोन हजार रुपयांचा वाढ केल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. महापालिका वित्त व लेखा विभागाने बोनसबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. याशिवाय सर्व खात्यांना संबंधित सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) आणि माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना तसेच बालवाडी शिक्षण सेविका, शिक्षक, शिक्षण सेवक २०२४-२५ च्या मुळ वेतन, महागाई भत्ता यावर ८.३३ टक्के आणि २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

SCROLL FOR NEXT