Pimpri Chinchwad Municipal Corporation demolishes unauthorized constructions Saam Tv News
मुंबई/पुणे

PCMC : पिपरी-चिंचवड पालिकेत बुलडोझर सरकार, बड्या धेंडांचे अलिशान बंगले जमीनदोस्त; इंद्रायणी नदी घेणार मोकळा श्वास

PCMC News : इंद्रायणी नदी पात्रात अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांची खैर नाही. कारण पिंपरी चिंचवड महापालिकेनं धडक कारवाई करत नदीपात्रातील ३६ आलिशान बंगले जमीनदोस्त केले आहेत. महापालिकेच्या कारवाईमुळे भूमाफियांच्या पायाखालची वाळू सरकलीय.

Prashant Patil

मिताली मठकर, साम टिव्ही

पुणे (पिंपरी-चिंचवड) : हे गाझापट्टीतलं दृश्य नाही, भारतीय लष्करानं उध्वस्त केलेल्या पाकिस्तानातलं दहशतवाद्यांचं तळंही नाही. तर हा आहे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी इंद्रायणी नदी पात्रात अवैधरित्या उभारण्यात आलेल्या आलिशान बंगल्यांवर केलेला सर्जिकल स्ट्राइक. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली इथं झरे वर्ल्ड कडून निळ्या पूर रेषेचं उल्लंघन करत इंद्रायणी नदीपात्रात अनधिकृतपणे प्लॉटिंग करण्यात आले. या प्लॉट्सवर काही धन दांडग्यांनी ३६ बंगले उभारले . या प्रकरणात तक्रारदार आणि बंगले मालकांनी राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने ३१ मे पूर्वी हे अनधिकृत बंगले जमीनदोस्त करण्यासोबत इंद्रायणीचं नदीपात्र पूर्ववत करा करण्याचे आदेश महापालिकेला दिले. त्यानुसार पिंपरी चिंचवड-महापालिका आयुक्तांनी धडक कारवाई करत या ३६ बंगल्यांवर बुलडोजर फिरवला आणि श्रीमंतांचे बंगले अक्षरशः पत्त्यासारखे कोसळले.

महापालिकेच्या कारवाईमुळे इंद्रायणी नदी आता मोकळा श्वास घेऊ शकणारे. शिवाय नदीपात्रात अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांनाही चाप बसेल. विशेष म्हणजे या पुर्वीही ८ फेब्रुवारी २०१५ला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनं कुदळवाडी-चिखली परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवला होता. सलग ८ दिवस ही कारवाई सुरू होती. या कारवाईदरम्यान जवळपास ८२७ एकर क्षेत्रावरील अतिक्रमण तोडण्यात आलं. त्यामुळे महानगरपालिकेचा रस्ता आणि आरक्षणांसाठीचं एकूण १०० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त झालंय. आता पुन्हा एकदा महापालिका आयुक्त आणि दणका देत इंद्रायणी नदीपत्रातील ३६ बंगले जमीनदोस्त केले आहेत. त्यांचा आदर्श इतर महापालिका आयुक्तांनीही घेत धडक कारवाई करायला हवी. तरच अनधिकृत बांधकामांना चाप बसेल आणि भूमाफियांना कायमची अद्दल घडेल.

इंद्रायणी नदीपात्रातील ३६ अनधिकृत बंगले जमीनदोस्त

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा सर्जिकल स्ट्राइक

निळ्या पूर रेषेचं उल्लंघन करून उभारण्यात आले बंगले

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेची धडक कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदौर महामार्गावर आज पुन्हा ट्राफिक जाम

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

SCROLL FOR NEXT