Pune Metro Phase 2 Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro Phase 2 : पुणे मेट्रोच्या नव्या पर्वाला सुरुवात! २५ किमी लांब मार्ग अन् २२ नवी स्थानके, कसा आहे प्लॅन? वाचा

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मेट्रोच्या कामांना वेग आला आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत मेट्रोचे दोन मार्ग तयार केले जाणार आहेत. यातील एका मार्गावर २२ स्थानके असणार आहेत, तर दुसऱ्या मार्गावर ६ स्थानकांची उभारणी केली जाईल.

Yash Shirke

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू केली आहे. प्रकल्पातील खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी 'रचनाकार सल्लागार समिती'साठी खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.त्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पहिल्या टप्प्यातील मार्गांचा विस्तार अंतिम टप्प्यात असताना दुसऱ्या टप्प्यातील पाच मार्ग नव्याने प्रस्तावित करण्यात आले आहेत. यातील खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडी या २५.५१ किमी मार्गावर एकूण २२ स्थानके असतील. तर दुसऱ्या बाजूला नळ स्टॉप, वारजे, माणिकबाग या ६.१३ किमी मार्गावर ६ स्थानके असतील. या दोन्ही मार्गांवरील स्थानकांची रचना भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून आणि इतर दळणवळण यंत्रणा परिस्थितीनुरूप सुनिश्चित करण्यासाठी 'मेट्रो'ने खासगी रचनाकार सल्लागार समितीची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत.

खडकवासला-खराडी मार्ग (२५.५१ किलोमीटर २२ स्थानके)

खडकवासला, दळवेवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, देशपांडे उद्यान, स्वारगेट (उत्तर), सेव्हन लव्हज चौक, पुणे कटक मंडळ, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर फाटा, मगरपट्टा (दक्षिण), मगरपट्टा मध्य, मगरपट्टा (उत्तर), हडपसर रेल्वे स्थानक, साईनाथनगर, खराडी चौक आणि खराडी बायपास अशी २२ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत.

नळ स्टॉप ते वारजे माणिकबाग (६.१२ कि.मी. ६ स्थानके)

माणिकबाग, दौलतनगर, वारजे, डहाणूकर कॉलनी, कर्वे पुतळा आणि नळ स्टॉप ही ६ स्थानके आहेत.

स्थानकांमधील रचना

परिसरानुसार स्थानकाची रचना, प्रवाशांना सहज आणि सुलभ प्रवास करण्यासाठी सुविधा, वातानुकूलित यंत्रणा, स्थानकावरील विद्युत आणि सौर यंत्रणांची सुविधा, अग्निसुरक्षेपासून हरित इमारतीच्या दृष्टीने नैसर्गिक स्त्रोतांचा पुरेपूर वापर, स्वच्छतागृहे, उपाहारगृहे, वस्तू विक्री दुकाने, ध्वनियंत्रणा आणि इतर मानकांनुसार देखभाल दुरुस्ती आदींचा विचार करून अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कंपनीची नियुक्ती असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडणार? महत्त्वाचं कारण आले समोर, वाचा सविस्तर...

Yuzvendra Chahal: ३ तरूणींमध्ये फसला चहल! व्हायरल फोटोवर कमेंट करत म्हणाला, २-३ अजून राहिल्यात...!

Valentine Special Cake : व्हॅलेंटाइन स्पेशल घरच्या घरी बनवा टेस्टी आणि झटपट कॉफी केक, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: पार्थ पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी दाखल

Parth Pawar : मोठी बातमी! पार्थ पवार अचानक शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या भेटीला, नेमकी चर्चा काय ?

SCROLL FOR NEXT