Nanded News : 'आमच्या मुलीशी का बोलतोस..' प्रेम प्रकरणातून मारहाण, तरुणाने गळफास घेऊन संपवले जीवन

Nanded City News : प्रेयसीच्या कुटुंबीयांनी मारहाण करत धमकी दिल्यानंतर एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीसांनी मुलीसह सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Nanded News
Nanded NewsSaam Tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही, प्रतिनिधी

'आमच्या मुलीशी तू का बोलतोस' असे म्हणत नातेवाईकांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच गावात बेज्जत करतो अशी धमकी देखील दिली. याच भीतीपोटी एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नांदेड शहराजवळच्या सुगाव या ठिकाणी गुरुवारी सकळी साडे आठच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीसह ७ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नितीन प्रभू शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे. नितीन शिंदे या तरुणाचे थुगाव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. तीन ते चार वर्षांपूर्वी दहावीत शिकत असताना दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. एक वर्षापूर्वी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या या प्रेमप्रकरणाबाबत माहिती झाली. यावेळी दोघांची घरच्यांनी समजूत काढली.

दरम्यान सहा महिन्यापूर्वी मुलीच्या चुलत भावाने 'मुलीशी फोनवर का बोलतो' असे म्हणत नितीनला मारहाण केली. १८ मार्च रोजी नितीन कामाहून घरी परतत असताना मुलीच्या घरच्यांनी त्याला पुन्हा मारहाण केली. आम्ही देशमुख आहोत, तुम्ही पाटील आहात; तुमची औकात नाही, रस्त्यावर आणून बेज्जत करतो, चिरून टाकतो अशी धमकी देखील दिली.

Nanded News
Saurabh Murder Case : लोंबकळणारी त्वचा, हलणारे दात, हृदयापर्यंत वार; सौरभचं पोस्टमॉर्टेम करताना डॉक्टरांचाही थरकाप

भीतीपोटी नितीन शिंदे या तरुणाने गुरुवारी राहत्या घरी सिलिंगला दोरी बांधली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीनचे वडील प्रभू शिंदे यांनी केलेल्या तक्रारीवरुन मुलीसह संतोष भोसले, विक्रम भोसले, अर्जुन भोसले, नितीन भोसले, ज्ञानदेव भोसले यांच्यावर लिंबगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nanded News
Sangli News: बापाचं सैतानी कृत्य! १३ वर्षीय लेकीवर ४ महिने वारंवार बलात्कार, आईकडून भंडाफोड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com