Pune Crime News AI Image
मुंबई/पुणे

Pune : हॉटेलच्या शेजारील झुडपात आढळला तरुणाचा मृतदेह; चिखलीतील घटनेनं पुणे हादरलं!

Pune Pimpari Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात आरंभ हॉटेलजवळ झुडपांमध्ये २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. चिखली पोलिसांकडून तपास सुरू.

Alisha Khedekar

  • पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात अनोळखी तरुणाचा मृतदेह

  • रस्त्यालगत झुडपांमध्ये मृतदेह आढळून आला

  • मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याची प्राथमिक माहिती

  • मृतदेह गेल्या दोन दिवसांपासून त्या ठिकाणी असण्याची शक्यता

गोपाळ मोटघरे,पुणे

पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरंभ हॉटेलपासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपांमध्ये हा मृतदेह आढळून आला. मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरंभ हॉटेलजवळील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये एक तरुण पडलेल्या अवस्थेत असल्याचे आढळले. स्थानिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता झुडपांमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला.

प्राथमिक माहितीनुसार, हा मृतदेह गेल्या दोन दिवसांपासून त्या ठिकाणी पडून असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे की त्याचा नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) पाठवला आहे. तेथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून, त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. सध्या मृत तरुणाची ओळख पटलेली नसल्याने पोलीस त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून मिळणाऱ्या माहितीनुसार चिखली पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC : स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्या; ठाकरे गटाचे महापालिका मुख्यालयासमोर ढोलताशा आंदोलन

Bathroom Hygiene: बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवावा की बंद? तुमची 1 सवय पडू शकते महागात, वाचा नेमकं काय घडतं?

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या कळंब तालुक्यात भूकंपाचा धक्का; एकलासपूरमध्ये 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

Gokul : शासननियुक्त चार संचालक कोण? गोकुळचा पडद्यामागचा खेळ सतेज पाटलांकडून संघर्ष मोर्चा सभेत उघड, राजकारणात खळबळ!

Skin Care Tips For Women: महिलांसाठी खास स्किनकेअर रूटीन: चेहऱ्यावर कशाच्या नंतर काय लावले पाहिजे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT