भाजप कार्यालयावर तुफान दगडफेक, प्रसिद्ध यूट्यूबरच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानंतर वाद विकोपाला

Bihar Political News : पटण्यात प्रसिद्ध यूट्यूबर आर्यन केल्विनच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर चाहत्यांचा गोंधळ. वीरचंद पटेल मार्गावर भाजप कार्यालयावर दगडफेक केल्याची माहिती.
Aryan Calvin event controversy in Patna Bihar
Aryan Calvin event controversy in Patna BiharAI Image
Published On: 

बिहारची राजधानी पटणा येथे रविवारी एका कार्यक्रमावरून मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. यूट्यूबर आर्यन केल्विन याच्या समर्थकांनी वीरचंद पटेल मार्गावर जोरदार गोंधळ घातला. यावेळी संतप्त चाहत्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पटणा येथील मिलर स्कूल मैदानावर एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुण उपस्थित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी होऊ शकते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली.

Aryan Calvin event controversy in Patna Bihar
Winter Chilblains : थंडीमध्ये हात-पायांना खाज, जळजळ आणि सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात

मात्र, कार्यक्रमाची परवानगी नाकारल्यामुळे इन्फ्लुएन्सरच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. अनेक तरुण कार्यक्रमासाठी मैदानावर पोहोचले होते. पण कार्यक्रम होणार नसल्याचे समजल्यानंतर चाहत्यांनी विरोध करायला सुरुवात केली. सुरुवातीला सुरू झालेला विरोध हळूहळू वाढत गेला आणि त्याचे रूप गोंधळात झाले. यानंतर वीरचंद पटेल मार्गावर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. संतप्त चाहत्यांनी भाजप कार्यालयाच्या दिशेने दगडफेक केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावर काही काळ अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले होते.

Aryan Calvin event controversy in Patna Bihar
Laxmi Yojana : महिलांसाठी महत्त्वाची बातमी! लक्ष्मी योजनेचे दरमहा २५०० रुपये खात्यात जमा होणार; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

घटनेची माहिती मिळताच परिसरातील परिस्थितीकडे पोलिसांनी लक्ष दिले. या प्रकरणात नेमके किती लोक सहभागी होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तसेच या दगडफेकीत कोणी जखमी झाले आहे का, याचीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानंतर झालेल्या या गोंधळामुळे पटणा शहरात चर्चेला उधाण आले आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि या घटनेमागे नेमकी कोणाची भूमिका होती, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.