Shocking : नात्याला काळिमा! मध्यरात्री सख्ख्या भावानेच काढला भावाचा काटा; धक्कादायक कारण आलं समोर

Solapur Crime News : सोलापूरच्या उमा नगरी परिसरात सख्ख्या भावाने कुऱ्हाडीने वार करून भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना. संभाजी माने यांचा मृत्यू.
Solapur Crime News
Solapur Crime News AI Image
Published On: 

सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील उमा नगरी परिसरात सख्ख्या भावानेच आपल्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाजी देवीदास माने असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर तानाजी देवीदास माने असे आरोपी भावाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संभाजी माने हा दारूच्या नशेत आपल्या आईला त्रास देत असल्याचा आरोप आहे. याच कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या तानाजीने संभाजीवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात संभाजीचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Solapur Crime News
Winter Chilblains : थंडीमध्ये हात-पायांना खाज, जळजळ आणि सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात

घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले. या पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

Solapur Crime News
Breaking News : उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली; चेन्नई दौरा रद्द

दरम्यान, मृत संभाजी माने याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. दोन्ही भावांमध्ये यापूर्वी काही वाद होते का? तसेच आईला होणाऱ्या त्रासावरूनच ही घटना घडली का? याचा शोध पोलीस घेत आहेत. या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यामागील खरे कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.