Pune Crime News x
मुंबई/पुणे

Pune Crime : 'आम्हीच इथले भाई' म्हणत पुण्यात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, पाहा Video

Crime News Pune: पुण्यात गुंड निलेश घायवळ टोळीकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. टोळीतील गुंडांनी रात्री एकावर गोळीबार केला. त्यानंतर १५ मिनिटांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : पुण्यामध्ये गुंड निलेश घायवळ टोळीच्या उच्छाद मांडला आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये निलेश घायवळ टोळीने मध्यरात्री गोळीबार केला. या गोळीबारामध्ये एका व्यक्तीला ३ गोळ्या लागल्या. गोळीबारनंतर टोळीतील गुंडांनी एकावर कोयत्याने वार केले. या दोन्ही घटनेमधील आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात निलेश घायवळ टोळीतील तरुणांनी कोथरूड परिसरात गोळीबार केला. आम्हीच इथले भाई म्हणत त्यांनी ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ या व्यक्तीवर गोळीबार केला. ही घटना कोथरूडच्या मुठेश्वर मंदिरासमोर उभा असताना प्रकाश धुमाळवर गोळीबार झाला. यात त्याला ३ गोळ्या लागल्या.

आम्हीच इथले भाई असे म्हणत टोळीतील तरुणांनी गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर १५ मिनिटांनंतर निलेश घायवळ टोळीतील गुन्हेगारांनी वैभव साठे या तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात निलेश घायवळ टोळीकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दोन्ही घटनेत सहभागी ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

कोथरूड पोलिसांनी प्रशांत धुमाळ याच्यावर गोळीबार आणि वैभव साठे याच्यावर कोयत्याने वार करणे या दोन्ही वेगवेगळ्या घटना प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी निलेश घायवळ टोळीतील मयूर कुंभारे, गणेश राऊत, मयंक व्यास, आनंद चांदलेकर, दिनेश फाटक आणि रोहित आखाड यांना अटक केली आहे. हे सर्वजण घायवळ टोळीतील सराईत गुन्हेगार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT