Heatwave X (Twitter)
मुंबई/पुणे

Pune Weather : पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही; आणखी २ दिवस सूर्य आग ओकणार, शहरात तापमान ४० अंशावर

Pune Heatwave : पुणे शहरात ठिकठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. लोहगाव परिसरात सलग दोन दिवस ४० अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पुढचे दोन दिवस उन्हाच्या झळा तीव्र राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत आहे. दिवसा उन्हाचे चटके बसत आहेत. तर रात्रीदेखील उकडत आहे. यंदा राज्यामध्ये जास्त तापमान राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचेही म्हटले जात आहे. अशातच पुणे शहरातील यावर्षीच्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे शहरातील या वर्षाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद आज (१३ फेब्रुवारी) रोजी झाली आहे. पुणे शहरातील लोहगाव परिसरात आज ४०.४ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी लोहगाव परिसरामध्ये तापमान ४० डिग्रीपेक्षा जास्त आहे. कोरेगाव पार्क भागातही आज तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर होता.

हवामान विभागाने पुणे शहर आणि आसपास पुढचे काही दिवस उन्हाचे चटके बसणार असल्याचे म्हटले आहे. आणखी २ दिवस पुण्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन शासनाद्वारे करण्यात आले आहे.

पुणे शहरातील आजचे तापमान (डिग्री सेल्सिअस मध्ये)

शिवाजीनगर: 38.7

पाषाण: 38.7

लोहगाव: 40.4

मगरपट्टा:39.4

कोरेगाव पार्क: 40.0

एन डी ए: 38.8

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratangad Fort History: सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रतनगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Dasara Melava Live Update : भाषणादरम्यान कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पंकजा मुंडे भडकल्या

Face Care: दररोज फेस पावडर लावण्याची सवय आहे, मग चेहऱ्याला होऊ शकतात 'हे' स्किन प्रॉब्लेम्स

Prajakta Mali: जांभळ्या साडीत प्राजक्ताचं मराठमोळ सौंदर्य...

Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगावच्या मेहरूण तलावातील घटना

SCROLL FOR NEXT