Pune Crime : माझा खून झाल्यानंतर दखल घेणार का? पुण्यातल्या 'त्या' तरुणीचा पोलिसांना सवाल; नेमकं प्रकरण काय?

Pune News : लग्नासाठी जबरदस्ती करणाऱ्या तरुणाच्या विरोधात विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी अजूनही मोकाट आहे, तो मला धमकी देत आहे, माझा खून झाल्यानंतर पोलीस त्याच्यावर कारवाई करणार का? असे तरुणीने म्हटले आहे.
Pune female student news
Pune female student newsSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुणे स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणामुळे पुण्यात महिला सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. हे प्रकरण ताजं असताना पुण्यातल्या एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका विद्यार्थिनीचा गैरफायदा उचलल्याची घटना उघडकीस आली आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात ही तरुणी राहते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका तरुणासोबत तिची ओळख झाले. या तरुणाने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेचा गैरफायदा घेतला आणि तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर त्याने लग्न करण्यासाठी पीडितेमागे तगादा लावला.

'लग्न न केल्यास ठार मारण्याची धमकी तरुणाने दिल्याचे पीडितेने सांगितले आहे. या प्रकारानंतर तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. २६ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून बरेच दिवस झाले तरीही आरोपीवर कुठलीच कारवाई झाली नाही', अशी माहिती पीडितेने दिली आहे.

Pune female student news
Pune Swargate ST Depot Case : नराधम दत्ता गाडेला किती शिक्षा होणार? कायदा काय सांगतो?

'आरोपी अजूनही मोकाट आहे. मी गुन्हा मागे घ्यावा यासाठी तो माझ्यावर दबाव टाकत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने कोयत्याचे फोटो पाठवून ठार मारण्याची धमकी दिली आहे. एकीकडे पोलीस कारवाई करत नाहीत आणि दुसरीकडे आरोपी धमक्या देतो आहे. यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. माझा खून झाल्यानंतरच दखल घेणार का?' असे पीडितेने म्हटले आहे.

crime news whatsapp
crime news whatsappsaam tv
Pune female student news
Pune Crime : रक्त, केस अन् वीर्य; दत्ता गाडेची नखापासून ते केसापर्यंत तपासणी, गुन्हा सिद्ध झाल्यास थेट...

दरम्यान यावर पोलिसांनीही आपली बाजू मांडली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा शोध घेणे सुरु असल्याचे सांगितले आहे. आरोपीचा मोबाईल बंद असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली आहे.

Pune female student news
Crime News : इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलमध्ये बोलवून अश्लील व्हिडीओ, मित्रानेच केला घात; साथीदारांसह दीड वर्ष बलात्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com