Crime News : इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलमध्ये बोलवून अश्लील व्हिडीओ, मित्रानेच केला घात; साथीदारांसह दीड वर्ष बलात्कार

Ahmedabad News : अहमदाबादमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ बनवले. या व्हिडीओवरुन ब्लॅकमेल करत सात जणांनी तरुणीचे शोषण केले.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या मित्राने साथीदारांसह तिचे तब्बल १६ महिने शोषण केले. सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना गुजरातच्या अहमदाबादमधील बनासकांठा येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही २० वर्षांची आहे. सहा महिन्यांपूर्वी तिची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका तरुणाशी ओळख झाली. २०२३ मध्ये या तरुणीने पालनपूरच्या एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याच दरम्यान ती नोव्हेंबर २०२३ मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाला भेटायला एका हॉटेलमध्ये पोहोचली.

Crime News
Navi Mumbai Crime: नवी मुंबई हादरली! मुलीला २९ व्या मजल्यावरून फेकलं, मग आईनेही घेतली उडी

भेटीदरम्यान त्या तरुणाने पीडितेच्या कपड्यांवर मुद्दामून जेवण सांडले. त्यानंतर तो तरुण पीडितेला घाण झालेले कपडे बदलण्यासाठी हॉटेलमधल्या एका रुममध्ये घेऊन गेला. कपडे बदलत असताना तरुणाने पीडितेचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ काढले. या व्हिडीओवरुन आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल केले.

Crime News
Crime News: धडापासून शिर वेगळं अन् हात- पाय मोडून विहीरीत फेकलं, अहिल्यानगरमध्ये नेमकं चाललंय काय?

अश्लील व्हिडीओ काढल्यानंतर आरोपी तरुणाने पीडितेला ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर बलात्कार केला. पुढे त्याच्या सहा मित्रांनीही पीडित तरुणाचे शोषण केले. या सात जणांनी १६ महिन्यांच्या कालावधीत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. पीडितेच्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी या सात जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Crime News
Beed Crime: बीडमध्ये गुंडाराज; जमिनीच्या वादावरून कुटुंबाला बेदम मारहाण, कुमशी गावातील धक्कादायक प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com