Pune Police Mourn the Death of Dedicated Officer Saam
मुंबई/पुणे

पुण्यातील वरिष्ठ पोलिसाचे कर्करोगाने निधन; एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून होती ओळख, पोलीस दलात हळहळ

Pune Police Mourn the Death of Dedicated Officer: पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन. संदीप भोसले यांच्या निधनामुळे पोलिस दलात हळहळ. वयाच्या ५५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टिव्ही

पुणे पोलीस दलातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून संदीप भोसले कर्करोगाने ग्रस्त होते. अखेर त्यांची गुरूवारी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पुणे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील हडपसर येथील अमरधाम स्मशानभूमीत शोकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे शहर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकपदी असताना त्यांनी पुणे शहरातील अनेक गुन्ह्यांची उकल केली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली आणि त्यावेळी त्यांना कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा पुण्यात बदलीसाठी विनंती केली होती. बदली झाल्यानंतर ते शहरात परतले. काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मात्र, उपचारादरम्यान, त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि २ मुलं असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर भोसले परिवारावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

१९९४ रोजी हवालदार म्हणून संदीप भोसले पोलीस दलात रुजू झाले. नंतर सेवाअंतर्गत परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन २००४ रोजी पोलीस उपनिरीक्षक पदावर हजर झाले. २०१७मध्ये पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळवून त्यांनी महाराष्ट्र पोलीस खात्यातील अत्यंत जबाबदारीच्या ठिकाणी म्हणजेच गडचिरोली, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, गुन्हे अन्वेषण, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली.

२०१२मध्ये एलसीबी पुणे ग्रामीण येथे सपोनि या पदावर कामकाज करताना यवत पोलीस ठाणे हद्दीत सुपा घाट येथे रेकॉर्डवरील आरोपी बाळू ढोरे यास पकडण्यासाठी गेले असताना आरोपीने भोसले यांच्यावर गोळीबार केला. एक गोळी त्यांच्या डाव्या दंडामधून गेली. आत्मरक्षणाचे हेतूने त्यांनीही आरोपीवर गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला.

त्यांच्या कार्यकाळात त्यांनी १२ पेक्षा अधिक मोस्ट-वॉन्टेड आरोपींना अटक केली. पुणे शहर पोलीस दलाकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांना भारतरत्न द्या! कोणी केली मागणी? VIDEO

Pune: मुंढवा जमीन घोटाळ्यात अनेकांची नावं समोर येणार, तहसीलदाराचा मोठा खुलासा, म्हणाले - 'वरिष्ठांच्या दबावामुळेच...'

Maharashtra Live News Update: वलसाडच्या उंबरगाव तालुक्यातील एका गावात कारखान्याला भीषण आग

White Saree Blouse: पांढऱ्या रंगाच्या साडीवर मॅचिंग ब्लाऊज कोणते? या आहेत एकापेक्षा एक ट्रेडिंग डिझाईन्स

6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6....वैभव सूर्यवंशीनं पाडला षटकारांचा पाऊस; UAE विरुद्ध ठोकलं तुफानी शतक

SCROLL FOR NEXT