भयंकर! गरोदर महिलेच्या पोटावर लाथ मारली, क्षुल्लक वादामुळे जन्माला येण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू

Pregnant Woman Loses Unborn Child: कल्याणच्या मोहने गावात क्षुल्लक वादातून भीषण हाणामारी. आरोपीकडून गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला. महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू.
Kalyan Crime News Pregnant Woman Loses Unborn Child
Kalyan Crime News Pregnant Woman Loses Unborn ChildSaam
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही

कल्याणजवळील मोहने गावातील लहूजीनगर परिसरात एक भयंकर घटना उघडकीस आली. क्षुल्लक कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यादरम्यान, गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. आरोपीनं गरोदर महिलेच्या पोटावर जोरात लाथ मारली. या मारहाणीमुळे महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण–कसारा रेल्वे मार्गालगतच्या मोहने गावतील लहूजीनगर परिसरात क्षुल्लक कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. तक्रारदाराच्या मित्राच्या डोक्यावरची टोपी आरोपीने काढून स्वतःच्या डोक्यावर ठेवली. त्यानंतर तक्रारदाराने ती टोपी परत घेत आपल्या मित्राला दिली. याच क्षुल्लक कारणाचा मनात राग धरून आरोपीने वाद घालत मारहाण सुरू केली.

Kalyan Crime News Pregnant Woman Loses Unborn Child
समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात, भाविकांच्या पीकअपला कारची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

हाणामारी दरम्यान आरोपीने गरोदर महिलेला लक्ष्य करत तिच्या पोटावर जोरात लाथ मारली. या मारहाणीत गरोदर महिला गंभीर जखमी झाली. गरोदर महिलेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी पोटातील बाळ मृत झाल्याचे सांगितले.

Kalyan Crime News Pregnant Woman Loses Unborn Child
घरात कॉकरोच अन् पालींचा वावर वाढलाय? कापसाचा करा 'असा' वापर; मिनिटांत पाली गायब

या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक कार्यरत असून, पुढील चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com