School Bus Accident At Pune Solapur Highway Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: चालकाला फिट आली अन्..., पुणे-सोलापूर महामार्गावर स्कूल बसला भीषण अपघात

School Bus Accident At Pune Solapur Highway: ४० विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. थेऊर फाट्यावर ही घटना घडली.

Priya More

पुणे - सोलापूर महामार्गावर स्कूल बसला अपघात झाला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना ही घटना घडली. थेऊर फाटा येथे हा अपघात झाला. या बसमध्ये ४० विद्यार्थी होते. चालकाला फिट आल्यामुळे ही घटना घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. या अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर ट्राफिक जाम झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी येथून विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूलच्या दिशेने निघाली होती. यावेळी थेऊर फाट्याच्या चौकात रस्ता क्रॉस करताना ड्रायव्हरला अचानक फिट आली. भरधाव वेगान असलेल्या या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यांमध्ये पडली आणि अपघात झाला.

या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र अपघात झाल्यामुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. स्थानिक नागिराकांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. बसमधील ४० विद्यार्थ्यांना पर्यायी वाहनाने स्कूलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच काही मुलांना त्यांचे पालक घरी घेऊन गेले आहेत.

तर बस चालकाला कुंजीरवाडी येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सदर बस ट्रॅक्टरच्या सहाय्याने खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपच्या 7 खासदारांना दिलासा, भाजप प्रवेशाला मंजुरी

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT