Mumbai Accident : ड्युटी संपवून घरी जात होते आजोबा; पाठीमागून स्कूल बस आली अन्...

Dahisar Accident News : ड्युटी संपवून घरी पायी निघालेल्या ७१ वर्षीय सुरक्षा रक्षकाला स्कूल बसने धडक दिली. यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. दहीसरमध्ये ही दुर्घटना घडली.
Mumbai Accident News
Mumbai Accident NewsYandex
Published On

Mumbai News : सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या ७१ वर्षीय वृद्धाचा स्कूलबसच्या धडकेत मृत्यू झाला. ते नाइट शिफ्ट संपवून पायी घराकडे निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली. घटनेनंतर काही वेळाने स्कूल बसचालकाला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Accident News
Accident News : दुचाकीस्वारास वाचविण्यात कार अनियंत्रित; थेट घुसली गॅरेजमध्ये, एकाचा मृत्यू, चौघे जखमी

मोहन मुदिक असं मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होते. बुधवारी ते रात्रपाळीवर होते. गुरुवारी सकाळी ते कामावरून घरी पायी जात होते. त्याचवेळी त्यांना पाठिमागून येणाऱ्या स्कूलबसने धडक दिली. यात ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास दहिसर पूर्वेकडील अशोकवन परिसरात झाला. बोरिवली पूर्वेकडे काजुपाडा परिसरात राहणारे मुदिक यांचा या अपघातात मृत्यू झाला.

मुदिक हे सकाळी ड्युटीवरून घरी पायी जात होते. त्याचवेळी अरविंद गणपत कापसे हा स्कूलबस घेऊन निघाला होता. तिथल्याच एका स्टॉपवरुन त्याने शाळेतल्या मुलांना बसमध्ये बसवले आणि तो निघाला. त्याचवेळी त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. पायी जाणाऱ्या मुदिक यांना बसची जोरदार धडक बसली. अपघातानंतर कापसे याने एक रिक्षा थांबवली. पायी जाणाऱ्या लोकांच्या मदतीने त्याने मुदिक यांना रिक्षात बसवले आणि शताब्दी रुग्णालयात नेले. मुदिक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कापसे तेथून निघून गेला.

पोलिसांनी सांगितले की, या अपघाताच्या घटनेबाबत रुग्णालयातून माहिती मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी बसचालक कापसे याला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Mumbai Accident News
Vande Bharat Express Accident : वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात, मोठा अनर्थ टळला, पण...

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com