Sassoon Hospital Superintendent Yalappa Jadhav Saam Tv
मुंबई/पुणे

Sassoon Hospital: ससूनमधील आणखी एक धक्कादायक प्रकार उघड, सहप्राध्यापकाला केले अधीक्षक; यलप्पा जाधव यांच्यावर कारवाई होणार का?

Sassoon Hospital Superintendent Yalappa Jadhav:ससूनचे अधीक्षक यलप्पा जाधव यांची अधीक्षकपदी नियुक्ती वादात सापडली आहे. यलप्पा जाधव हे सहप्राध्यापक असताना देखील त्यांना ससूनचे अधीक्षक बनवण्यात आले.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील ससून रुग्णालय (Sassoon Hospital) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटीलला मदत केल्याचे प्रकरण, पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचे प्रकरण आणि आता बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडल्याच्या प्रकरणामुळे ससून रुग्णालय चर्चेत आले आहे. ललित पाटील प्रकरण आणि पोर्शे कार अपघात प्रकरणात ससूनच्या डीन आणि अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. आाता बेवारस रुग्णांना रस्त्यावर सोडल्याच्या प्रकरणात ससूनच्या डीन एकनाथ पवार आणि अधीक्षक यलप्पा जाधव यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अशामध्येच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससूनचे अधीक्षक म्हणजे डीन यलप्पा जाधव यांची अधीक्षकपदी नियुक्ती वादात सापडली आहे. यलप्पा जाधव हे सहप्राध्यापक असताना देखील त्यांना ससूनचे अधीक्षक बनवण्यात आले. पात्रता नसताना देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली. शासन आदेशानुसार प्राध्यापक असलेलीच व्यक्तीच अधिक्षकपदासाठी पात्र असते. अशामध्ये यलप्पा जाधव यांच्यावर वरदहस्त कोणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. यलप्पा जाधव यांच्यावर वरीष्ठ मंत्र्याची कृपादृष्टी असल्याची चर्चा होत आहे.

ससूनचे अधीक्षक यलप्पा जाधव हे सहप्राध्यापक आहेत. सहप्राध्यापक असताना त्यांना अधीक्षक करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने ८ मे २०२४ रोजी एक जीआर पारित केला आणि त्या जीआरनुसार हॉस्पिटलच्या अधीक्षक पदी एनएमसी गाईडलाईन्सनुसार प्राध्यापक या पदाची व्यक्ती अधीक्षक असणे गरजेचे आहे. त्यानुसार ससूनसारख्या अतिशय महत्त्वाच्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी गेले दोन महिने होऊनसुद्धा सहप्राध्यापक म्हणजेच असोसिएट प्रोफेसर ही व्यक्ती कार्यरत आहे. एकीकडे सरकार एनएमसी गाईडलाईन्सचा (National Medical Council) आधार घेऊन जीआर काढते आणि दुसरीकडे पात्रता नसलेली व्यक्ती, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मर्जीतली व्यक्ती, त्या पदावर कार्यरत ठेवते ही गोष्ट ससून रुग्णालय आणि प्रशासनासाठी अतिशय गंभीर गोष्ट आहे.

ससून मध्ये गेल्यावर्षभरामध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या असताना सुद्धा आणि ससून आणि बैजी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अतिशय सीनियर प्रोफेसर कार्यरत असताना सुद्धा त्यामधील एका सीनिअर प्रोफेसरला अतिरिक्त कारभार न देता अतिशय ज्युनिअर आणि बाहेरील व्यक्तीला या ठिकाणी प्रभारी अधिष्ठाता म्हणून नेमण्यात आलेले आहे. ससून हॉस्पिटलचे प्रशासकीय सोयीनुसार किंवा रुग्णसेवा व्यवस्थित व्हावी म्हणून नियुक्ती न करता एखाद्या मंत्र्याच्या किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकारी नेमून ससून रुग्णालयाचे प्रशासन कसे सुधारणार? , असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मंगळवारी ससून रुग्णालयामध्ये जी घटना घडली त्यामध्ये या अधिष्ठातांनी एका डॉक्टरला निलंबित केले. परंतू हा डॉक्टर कोणत्याही प्रकारचा अधिकारी नसून एक शिकाऊ म्हणजेच रेसिडेंट डॉक्टर आहे. निराधार रुग्णांना रस्त्यावर सोडून देणे ही घटना माणुसकीला काळा फासणारी आहे आणि रुग्णालयाचा प्रमुख या नात्याने या घटनेसाठी तो निलंबित झालेला रेसिडेंट डॉक्टर जबाबदार नसून या रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक जबाबदार आहे, त्या विभागाचा विभाग प्रमुख जबाबदार आहे, या रुग्णालयाचा अधिष्ठाता हे सगळे लोकं या घटनेला जबाबदार आहेत. सरकार या तिन्ही अधिकाऱ्यांवरती कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहे हे पाहणं महत्वाचे राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

SCROLL FOR NEXT