Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी गुड न्यूज! खडकवासला धरण ९६ टक्के भरले, इतर धरणात किती पाणीसाठा?

Khadakwasla Dam Filled 96 Percent: पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण ९६ टक्के भरले. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी गुड न्यूज! खडकवासला धरण ९६ टक्के भरले, इतर धरणात किती पाणीसाठा?
Khadakwasla Dam Filled 96 PercentSaam Tv
Published On

सागर आव्हाड, पुणे

पुणेकरांसाठी (Pune) आनंदाची बातमी आहे. पुणेकरांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. कारण पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण (Khadakwadla Dam) ९६ टक्के भरले. हे धरण १०० टक्के भरण्यासाठी आणखी काही ४ टक्के पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रांमध्ये पडणाऱ्या दमदार पावासामुळे धरणांमधील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळी क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे चारही धरणातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. अशामध्येच खडकवासला धरण ९६ टक्के भरले आहे. सकाळी ७ वाजता या धरणातून ९४१६ क्यूसेक पाणी सोडले. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. अशामध्ये नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी गुड न्यूज! खडकवासला धरण ९६ टक्के भरले, इतर धरणात किती पाणीसाठा?
Pune News: पुण्यातील कोथरूडमध्ये विचित्र अपघात; खासगी बसची जीपसह दुचाकीला धडक, दोघे गंभीर जखमी

पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील दापसरे, धामण ओहोळ खोर्‍यासह पानशेत, वरसगाव, टेमघर, खडकवासला धरणक्षेत्रात सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीने सकाळी ५० टक्क्यांचा टप्पा पार केला. सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. खडकवासला धरणमाथ्यापेक्षा १० ते १५ पट अधिक पाऊस पानशेत, वरसगाव खोर्‍यात पडत आहे. तर त्यापेक्षा दुप्पट पाऊस शेवटच्या टोकाला असलेल्या रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील डोंगरमाथ्यावर पडत आहे. त्यामुळे आंबी, मोसे आणि मुठा नद्यांसह ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत.

Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी गुड न्यूज! खडकवासला धरण ९६ टक्के भरले, इतर धरणात किती पाणीसाठा?
Pune Viral Video : भात लावणी करताना एकापाठोपाठ 6 ट्रॅक्टर चिखलात रुतले; भोरमधील विचित्र प्रसंग, पाहा VIDEO

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मागील चार दिवसांपासून अति मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे घाट विभागात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा ताम्हिणी घाट परिसरात सर्वाधिक २६८ मिमी पावसाची नोंद झाली. पुण्यासह सातारा जिल्ह्यातील घाट विभागात हवामान विभागाचा रेड अलर्ट आहे. त्यामुळे बहुतांश घाट परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून अति जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

खडकवासला प्रकल्पातील धरणातील पाणीसाठा -

खडकवासला धरण - ९६.८७ टक्के

वरसगाव धरण - ५३.४० टक्के

पानशेत धरण - ६८.१२ टक्के

टेमघर धरण - ४८.६२ टक्के

Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी गुड न्यूज! खडकवासला धरण ९६ टक्के भरले, इतर धरणात किती पाणीसाठा?
Pune Exclusive: पालकांनो 'या' शाळांमध्ये अ‍ॅडमिशन घेऊ नका, पुण्यातील बंद झालेल्या शाळांची यादी 'साम टिव्ही'वर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com