सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे
पुण्यात बस, दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाल्याचं समोर आलंय. कोथरूडमध्ये ही दुर्घटना काल २३ जुलै रोजी घडली. कोथरूड मधील वनाज कंपनीजवळ संध्याकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात दोन तरुण जखमी झाले. एका तरुणाच्या गालामध्ये दुचाकीचा रॉड घुसल्यामुळे त्याला बाहेर काढणे खूप अडचणीचे झाले होते.
भीषण अपघात
डॉक्टर, अग्निशमन दलाचे जवान, गॅरेजमधील कामगार, पोलीस यांनी एकत्रितपणे काम करत या तरुणाची सुटका केली. दोघांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आलं (Pune News) होतं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला होता. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.
अपघात नेमका कसा घडला?
कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितलं (Accident At Kothrud) की, एका खासगी बसने जीपला उडवलं होतं. जीपच्या पुढे एक दूचाकी आणि त्यापुढे एक कार होती. जीप आणि कार यामध्ये दुचाकी अडकली. दुचाकीवरील एका तरुणाच्या गालात दुचाकीचा भाग अडकला होता. पोलिसांनी अग्निशमन आणि डॉक्टरांच्या सहकार्याने या तरूणाची सुटका केली. त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलवलं. यासंदर्भात बस चालकाला ताब्यात घेतलंय. अधिक तपास सुरू (Road Accident) आहे.
मुसळधार पाऊस अन् रस्त्यावर अंधार
जोरदार पाऊस, वीज गेल्याने अंधार रस्त्यावर पसरलेला होता. याच परिस्थितीत हा अपघात घडल्याने पौड रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला होता. बघ्यांची गर्दी झाली होती. कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वनाज कॉर्नर या ठिकाणी हा अपघात (Accident News) झाला. ड्रायव्हर आरोपी बाळू बाळासाहेब थोरात (राहणार चाफेकर चौक चिंचवड) याला ताब्यात घेण्यात आलंय. पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.