Pune News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune News : पुण्याच्या रुग्णालयात घुसले बांगलादेशी? स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात खळबळ

Bangladesh Citizen in Pune : .स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे पोलिसांनी तीन जणांना कमला नेहरू रूग्णालयातून ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तिघंही बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Tanmay Tillu

बातमी पुण्यातून...स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या ३ संशयित तरुणांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोशल मीडियावर या ३ तरुणांचे फोटो व्हायरल झाले होते... हे नेमके तरुण कोण आहेत? कुठून आले होते? काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूया..

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्यानं हादरवणा-या घटना घडतायत...कधी ड्रग्ज ऱॅकेट...कधी हिट अँड रन प्रकरण, तर कधी पूर...हे कमी होतं की काय बुधवारची सकाळ पुणेकरांसाठी खळबळजनक बातमी घेऊनच उजाडली....पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 3 संशयीत दहशतवादी घुसल्याची बातमी पसरली. हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकानं खबरदारी घेत तातडीने त्या तिघा संशयितांना एका खोलीत बंद केलं. पोलिस कंट्रोलरूमला या याबाबत फोन करण्यात आला. तातडीनं पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झालं...

पोलिसांनी खबरदारी म्हणून रुग्णालयातून रुग्ण आणि नातेवाईकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. कारण पोलिसांनी काल ३ संशियत लोकांचे फोटो रुग्णालय प्रशासनाला पाठवले होते. आणि तेच ते तिघे रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. त्यामुऴे अधिकच गोंधळ उडाला. या तिन्ही संशयतांच्या घरी पुणे पोलिसांनी आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने देखील जाडाझडती घेतली.

ताब्यात घेतलेले तरूण पुण्यातील लोहियानगर परिसरात राहणारे आहेत. ते मूळचे बिहारचे आहेत. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी बांग्लादेशी घुसखोरांवर कारवाई केली होती. त्यात 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमी असल्यानं पोलिसांनी या तिघांची अधिक सतर्कतेनं सखोल चौकशी सुरू केलीय. या घटनेमुळे मात्र पुणेकर जागरुक आणि सतर्क आहेत एवढं नक्की...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती जवळ आग लागल्याची घटना

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

Firecracker Safety Guide: फटाके फोडताना काळजी घ्या! डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना|VIDEO

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

SCROLL FOR NEXT