PMC Continues Anti Encroachment Drive Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात अतिक्रमणांवर पालिकेकडून हातोडा, सहाव्या दिवशी कारवाई सुरूच; नामांकित हॉटेल्सना दणका

PMC Continues Anti Encroachment Drive: पुण्यामध्ये पालिकेकडून अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू आहे. आज कारवाईचा सहावा दिवस आहे. या कारवाईदरम्यान हॉटेल्सला लक्ष्य केले जात आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुणे महानगर पालिका सध्या अॅक्शन मोडमध्ये आहे. शहरातील अतिक्रमणांविरोधात कारवाई केली जात आहे.. हॉटेल्स, चौपाट्यांवर हातोडा टाकला जात आहे. सलग सहाव्या दिवशी पुण्यात अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईत सोमवारी शहरातील नामांकित हॉटेल आणि चौपाट्यांना लक्ष्य करण्यात आले. तरुणांचे कट्टे बनलेल्या हॉटेलांमधील अतिक्रमणांवरही प्रशासनाने हातोडा चालविला.

पुण्यातील फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात सलग सहाव्या दिवशी सुरू असलेल्या या मोहिमेत तब्बल २ लाख ५ हजार ८०० चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली. विशेष म्हणजे, या कारवाईचा दणका काही नगरसेवकांनाही बसला आहे. आतापर्यंत ६ दिवसांत ६ लाख चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. शहरातील अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने महापालिका प्रशासनावर यापूर्वी नगरसेवकांनीच टीका केली होती. नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथावरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते.

सोमवारच्या कारवाईत हांडेवाडी रस्ता आणि हांडेवाडी चौक परिसरात ६७ हजार ५०० चौरस फूट, वडगाव बुद्रुक आणि धायरी परिसरात ३८ हजार २०० चौरस फूट, तर वारजे परिसरातील सेवा रस्त्यावर १८ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. ढोले पाटील रस्ता, ताडीवाला रस्ता आणि कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रस्ता परिसरात ४४ हजार ७०० चौरस फूट, तर नाना पेठ आणि रास्ता पेठेत १४ हजार चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली.

यासोबतच पुणे शहरातील टिळक रस्त्यावर ९ हजार ५०० चौरस फूट, तर वृद्धेश्वर घाट, विधी महाविद्यालय रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील फ्रंट आणि साइड मार्जिनमधील १३ हजार ५०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. शहराच्या वेगवेगळ्या भागांत एकाच वेळी पथके उतरवून ही कारवाई करण्यात आली.या मोहिमेत पुण्यातील काही नामांकित हॉटेल आणि चौपाट्यांवरही कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे गड, भव्यता पाहून व्हाल थक्क

Famous Actress : कुणीतरी येणार येणार गं! प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केली गुडन्यूज |PHOTOS

Maharashtra News Live Update: म्हसवेत शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध, प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार संघर्ष

Weather Update: ११ राज्यात धो-धो पावसाचा अंदाज, ताशी ४० ते ५० किमीच्या वेगाने वाहणार वारे

Winter Health : थंडीच्या दिवसांत हाताची बोटे सुन्न पडतायत? दुर्लक्ष करणं जीवावर बेतलं, ६ आजारांची असू शकतात लक्षणं

SCROLL FOR NEXT