पुणे शहरातील रिक्षा चालकांनी पुकारलेला संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. प्रवासी रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय रिक्षा संघटनांनी मागे घेतल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रिक्षा संघटनांनी हा निर्णय घेतला.अनधिकृत बाईक टॅक्सीच्या मुद्द्यावरून रिक्षा चालक आणि मालक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, RTO अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर संघटनांनी प्रवासी रिक्षा बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बैठकीदरम्यान RTO अधिकाऱ्यांनी अनधिकृत बाईक टॅक्सीविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन रिक्षा संघटनांना दिलंय. RTO चे पथक रस्त्यावर उतरून अनधिकृत बाईक टॅक्सींची तपासणी करणार असून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. रिक्षा चालक-मालक संघटना आणि RTO अधिकाऱ्यांची उद्या दुपारी पुन्हा एक बैठक होणार आहे.
बाईक टॅक्सी धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयाबाहेर रिक्षा संघटनांनी सोमवारी निदर्शने केली. रिक्षा चालकांनी दिवसभर संप पुकरल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. राज्य सरकारने बाईक टॅक्सीचे धोरण तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी पुण्यातील रिक्षा संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. सोमवारी सकाळी अकरा वाजता बिबेवाडी येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकदिवसीय संपाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर रिक्षा संघटनांकडून परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.