PM Modi Pune Visit Saam Tv
मुंबई/पुणे

PM Modi Visit Pune: पावसाचे विघ्न! पीएम मोदींचा पुणे दौरा रद्द

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Latest Political Updates in Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पुण्यामध्ये मोदींच्या हस्ते भूमिगत मेट्रोचे लाकार्पण होणार होते. पण हवामान खात्याकडून पुण्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता पीएम मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तब्बल 12 विकास कामांचं उद्घाटन तसेच मेट्रोच्या मार्गाचे लोकार्पण होणार होते. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर सभेचे देखील आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या सभेवर गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे सावट असल्यामुळे ही सभा होणार का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आज पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींचा पुणे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

स्वारगेट ते सिविल कोर्ट या भूमिगत मेट्रोचा लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं. एस पी कॉलेजच्या मैदानावर कालपासून प्रशासनाकडून तयारी देखील करण्यात आली होती. पावसाचे सावट लक्षात घेता सभेचे ठिकाण देखील बलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पर्यायी सभास्थळ म्हणून गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी देखील तयारी करण्यात आली होती. मात्र पुण्यात होत असलेल्या पावसामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जास्तीत जास्त कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनावर सत्ताधारी पक्षाच भर होता. पण पावसामुळे पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान पीएम मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे उद्घाटन देखील होणार होते. आता पुन्हा दौरा कधी होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता असल्याने मोदी हे पुढच्या १० दिवसांत पुण्यात पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Points Table: श्रीलंकेच्या विजयाने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! WTC फायनलमध्ये जाण्यासाठी 3 संघांमध्ये चढाओढ

Deepika Padukone: प्रेग्नंसीनंतर दीपिका पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर, आरोग्याबाबत दिली माहिती...

Marathi News Live Updates : विजेचा शॉक लागून तीन जण ठार तर एक जण जखमी,मृतात 13 वर्षाच्या मुलाचा समावेश

Sambhajinagar Corporation : कर भरणाऱ्यांनाच आता मनपा देणार कंत्राट; महापालिका प्रशासकांचा निर्णय, सादर करावे लागेल एनओसी

Maharashtra Politics : "देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवण्याचा प्लान, भाजपमधून तावडेंना पुढे आणलं जातंय"

SCROLL FOR NEXT