Pune St Bus And Car Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यात एसटी बस- कारची समोरासमोर धडक, एका महिलेचा मृत्यू; ६ जण गंभीर

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. एसटी बस आणि कारमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. खडकीतील बोपोडी येथे ही घटना घडली. जुन्या मुंबई-पुणे महामार्गवर हा अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण १८ जखमी झाले असून एकाचा मृत्यू झालाय. जखमींमध्ये ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकीच्या हद्दीतील बोपोडी येथे अपघात झाला. एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक देऊन हा अपघात झाला. सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात झाला. एसटी बसमधून १२ जण प्रवास करत होते. तर कारमधून ७ जण प्रवास करत होते. या अपघातामध्ये कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले. तर एसटी बसमधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. कारमधील जखमी झालेल्या ६ जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे. मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एसटी बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे तर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

या अपघातानंतर जुन्या मुंबई-पुणे महामार्गवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त दोन्ही वाहनं बाजूला हटवण्यात आले आहेत. सध्या वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. खडकी पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT