Satara Accident: मोठी बातमी! आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडवलं, २ जण ठार; गाडीचा अक्षरशः चक्काचूर

MLA Jaykumar Gore Accident News: आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीस्वाराला उडवले असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला.
Satara Accident: मोठी बातमी! आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक; १ जण ठार
MLA Jaykumar Gore Latest News: Saamtv
Published On

ओंकार कदम|सातारा, ता. २४ ऑगस्ट २०२४

साताऱ्यामधून एक मोठी अपघाताची बातमी समोर आलीआहे. सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते, माण खटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीस्वाराला उडवले असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या जखमी तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते, माण- खटाव विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. आमदार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीला उडवले असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला होता, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दुचाकीला उडवले, २ जण ठार

दहिवडीजवळील बिदाल शेरेवाडी भागामध्ये ही अपघाताची घटना घडली. आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील एसयुव्हीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून तर एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. अपघातानंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Satara Accident: मोठी बातमी! आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक; १ जण ठार
Maharashtra Politics: शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर! दिंडोशीमध्ये राडा; विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुखामध्ये तुफान हाणामारी

हा अपघात इतका भीषण होता की, आमदारांच्या ताफ्यातील गाडीचे मोठे नुकसान झाले आहे तर धडक दिलेल्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Satara Accident: मोठी बातमी! आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक; १ जण ठार
Pune News : धक्कादायक! पुण्यात तरुण डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कारच्या ड्रायव्हिंग सीटवरच सोडला जीव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com