नेपाळ येथील बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. आमदार एकनाथ खडसे यांच्या बालपणीच्या मित्राचे देखील निधन झालंय. अपघातात गंभीर जखमी असलेल्या जळगाव येथील आणखी तिघांचा मृत्यू झालाय. यासंदर्भातील माहिती खडसे यांनी माध्यमांना दिली. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो असं म्हणत खडसे भावूक झाले.
बालपणीचा मित्र गमावल्याने त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नेपाळमधील बस अपघातात (Nepal Bus Accident) मृत्युमुखी पडलेल्या 27 जणांचे मृतदेह विशेष विमानाने शनिवारी रात्री जळगाव येथे आणण्यात आले. विमानतळावरून मृतदेहांसाठी 27 स्वतंत्र अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती.
जळगाव विमानतळावर मृतदेह आणल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. जिवाभावाचे व्यक्ती गमावल्याने अनेकांनी हंबरडा फोडला होता. दरम्यान, विमानतळावरून रुग्णवाहिकेतून मृतदेह वरणगाव येथे नेण्यात आले. आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
या सर्व मयत व्यक्तींवर शनिवारी रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्दैवी बाब म्हणजे अपघातातील गंभीर जखमी असलेल्या आणखी तिघांचा मृत्यू झाला. यात एकनाथ खडसे यांच्या बालपणीच्या मित्राचा देखील समावेश होता. मित्राचे निधन झाल्याचे कळताच एकनाथ खडसे भावूक झाले होते. त्यांनी माध्यमांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
दरम्यान, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव येथील लखपती दीदी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाला तुम्ही जाणार का? असा सवाल माध्यमांनी एकनाथ खडसे यांना विचारला. यावर उत्तर देताना खडसे म्हणाले, शासकीय कार्यक्रम असूनही मला आमदार म्हणून कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नाही. त्यामुळे मी या कार्यक्रमाला जाणार नाही, असं खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.