Pune OBC Andolan News Saam TV
मुंबई/पुणे

Exclusive Video : पुण्यात सगेसोगरेच्या अध्यादेशाची ओबीसी बांधवांकडून होळी; मनोज जरांगेंच्या मागणीला कडाडून विरोध

Pune OBC Andolan Video : सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. यावेळी ओबीसी बांधवांनी भररस्त्यात सगेसोयरे अध्यादेशाची होळी केली आहे.

Satish Daud

ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी पुण्यात मंगेश ससाणे यांचे उपोषण सुरू आहे. आज मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, ५ दिवस झाले तरी सरकारकडून आंदोलनाची दखल न घेतल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. यावेळी ओबीसी बांधवांनी भररस्त्यात सगेसोयरे अध्यादेशाची होळी केली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

राज्य सरकार जाणून बुजून ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप ओबीसी बांधवांनी केला आहे. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला, तर कायदा-सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही ओबीसी बांधवांनी दिला आहे.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही राज्य सरकारचे काहीही ऐकून घेणार नाही. तसेच कोणत्याही बैठकीला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास ओबीसी उपोषणाचा हा वणवा राज्यभरात पेटेल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

"मराठ्यांना १३ जुलैच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या"

एकीकडे ओबीसी बांधवांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. १३ जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

सरकारकडून 'सगेसोयरे'साठी हालचाली

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपकडून सगेसोयरे अध्यादेशाच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप-शिवसेनेच्या मराठा नेत्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात दिल्लीत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT