Pune MNS Protest
Pune MNS Protest Saam Tv
मुंबई/पुणे

Pune MNS Protest: पुणे विद्यापीठाच्या कॅन्टिनमधील निकृष्ट जेवणावरून मनसे आक्रमक, आंदोलन करत दिला इशारा

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (Maharashtra Navnirman Vidhyarthi Sena) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Pune University) आंदोलन केले. कॅन्टिनमधील निकृष्ट जेवणाविरोधात मनसेने आंदोलन केले आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण खायला घातले. जेवणामध्ये सुधारणा नाही झाली तर मनसे यापेक्षा आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

पुणे विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विद्यापीठात आंदोलन केले. रेफ्रॅक्टारी चालक, भोजन समिती अध्यक्ष आणि कॅन्टीन मॅनेजर यांना याप्रसंगी जाब विचारत त्यांनी आंदोलन केले. जोपर्यंत जेवणाचा दर्जा सुधारत नाही तसेच विद्यार्थांना पौष्टिक, पोटभर आणि दर्जेदार जेवण माफक दरात मिळणार नाही तोपर्यंत विद्यार्थी जे जेवण दररोज जेवतात तेच जेवण दररोज विद्यापीठ प्रशासनाला खायला घालण्याचा आक्रमक पवित्रा यावेळी मनसेच्या वतीने घेण्यात आला.

आक्रमक झालेल्या मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी जेवणाची ताटं थेट कुलगुरूंच्या ऑफिस आवारात नेली आणि जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावून विद्यार्थी खातात ते निकृष्ट दर्जाचे जेवण संबंधितांना खायला घातले. जर या जेवणामध्ये सुधारणा झाली नाही तर मनसे पदाधिकाऱ्यांनी यापेक्षा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये गोंधळ झाल्याची घटना समोर आली होती. निकृष्ट दर्जाचे अन्न खायला दिल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये दुपारच्या जेवणामध्ये देण्यात आलेली भाजी आणि चपाती आंबट लागत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. संतप्त विद्यार्थ्यांनी कॅन्टिनमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. चपाती आणि भाजीची चव आंबट लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडून ताट तसेच ठेवून निघून गेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पुणे येथील Hit And Run प्रकरणातील अल्पवयीन मुलाला 12 तासात जामीन

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Today's Marathi News Live: नवी मुंबईत या वाहनांना प्रवेश बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

SCROLL FOR NEXT