Vasant More
Vasant More Saam TV Marathi

Pune : मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेचा शिलेदार अडचणी, त्या वक्तव्यामुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Shiv Sena UBT latest news : पुण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते वसंत मोरे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत विश्वनाथ लहाडे यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आला.
Published on

Vasant More booked under Atrocity Act in Pune : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पुण्यातील दिग्गज नेते वसंत मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत फिर्यादीला शिवीगाळ केल्याचा आरोपावरून वसंत मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत त्यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याने वसंत मोरे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत "लहाडे दारू पिला होता, त्याला बोलता येत नव्हतं. ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत होता", असं वक्तव्य मोरे यांनी केलं होतं असं फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंते मोरे यांच्या वक्तव्यानंतर विश्वनाथ लहाडे यांचा संताप अनावर झाला. लहाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वसंत मोरे यांनी बदनामी केली, त्यामुळे कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे असं तक्रारीत नमूद केलं होतं. या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार विश्वनाथ लहाडे हे 72 वर्षाचे असून ते व्यवसायाने ठेकेदार आहेत.

Vasant More
Darshan Scam : भाविकांची लूट! त्र्यंबकेश्वरमध्ये ३ हजारात १० मिनिटात दर्शन ? दर्शन स्कॅमचं 'रेटकार्ड' उघड?

विश्वनाथ लहाडे यांच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी आता वसंत मोरे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनीकडून वसंत मोरे यांच्या वक्तव्याचा सखोल तपास केला जात आहे. वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. वसंत मोरे आपल्या वक्तव्यावर ठाम राहतील की माफी मागतील, अशी चर्चाही पुण्यात सध्या सुरू आहे.

Vasant More
भयंकर! बायकोनं नवऱ्याच्या मदतीने भरदिवसा प्रियकराची केली हत्या, सपासप वार करताचा व्हिडिओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com