Kalyan Crime News : शेतीचा वाद जीवावर बेतला; बेदम मारहाणीत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : या मारहाणीत गंभीर जखमी झालेले शेतकरी चांगदेव बनकर व त्यांच्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam TV

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून केलेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे.

Kalyan Crime News
Jalgaon Crime : दुचाकी अडवून मारहाण करत पैसे घेऊन झाले पसार; जळगाव शहरातील घटना

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शेतीच्या वादातून काही दिवसांपूर्वी एका गटाकडून दुसऱ्या शेतकरी कुटुंबांला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले शेतकरी चांगदेव बनकर व त्यांच्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

चांगदेव यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थिचे प्रयत्न केले. मात्र उपचारा दरम्यान प्रकृती खालवल्याने चांगदेव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आलीये. चांगदेव यांना मारण करणाऱ्या अन्य साथीदारांना देखील अटक करावी अशी मागणी सांगदेव बनकर यांच्या कुटुंबीयांनी केलीये.

कल्याण तालुक्यातील रुंदे आंबिवली गावात चांगदेव बनकरे, पत्नी व दोन मुलांसह राहत होते. त्यांची दोन मुले दुग्ध व्यवसाय आणि शेती करतात. यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. 5 एप्रिल रोजी चांगदेव यांची पत्नी उषाबाई बनकरे शेतात असताना त्यांचे नातेवाईक बाळाराम टोके यांनी आमच्या शेतीत तू काय करते? तू इथून निघून जा, असे सांगितले .

उषाबाई यांनी घडलेला प्रकार तिच्या मुलांसह पतिला सांगितला. चांगदेव आणि त्यांचे कुटुंबिय बाळारामला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी बाळाराम याने ही शेती आमची आहे त्यावर तू मालकी हक्क कसा काय दाखवू शकतो? असा सवाल केला.

त्यामुळे चांगदेव आणि बाळाराम यांचा वाद वाढला. या वादात बाळाराम टोके त्यांची मुले इतर सहा ते सात जणांनी बनकर कुटुंबियांना दांडके आणि रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत चांगदेव बनकर यांची पत्नी उषाबाई आणि दोन मुले तसेच चुलता हे जखमी झाले.

चांगदेव यांना गंभीर अवस्थेत टिटवाळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी आधी दोन जणांना अटक केली होती. मात्र चांगदेव बनकर यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

चांगदेव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी आधी त्यांचा मृतदेह घेण्यास नकार दिला. या प्रकरणात नऊ आरोपी होते. सर्व आरोपींना पोलीस जोपर्यंत अटक करीत नाही. तोपर्यंत चांगदेव यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.

यावर पोलिसांनी समजूत काढली तेव्हा या प्रकरणात सागर टोके, अमित टोके आणि प्रल्हाद टोके यांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य सहा आरोपींना अटकेचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर चांगदेव कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

Kalyan Crime News
Pune Crime News : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगूस; चौकातील लाईट बंद करून वाहनांची तोडफोड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com