Pune Accident : पुण्यात विचित्र अपघात, कारची ७-८ वाहनांना धडक; मुंबईतही फ्री वेवर ट्रक उलटला

Pune And Mumbai Accident News: पुण्यातील एम जी रोडवर कारला भीषण अपघात झाला. भरधाव कारने 7 ते 8 वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 7 ते 8 वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये १ जण किरकोळ जखमी झाला आहे.
Pune Car Accident
Pune Car AccidentSaam Tv

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये (Pune) भरधाव कारने 7 ते 8 वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. अपघाताची ही घटना पुण्यातील एम जी रोडजवळ घडली आहे. या अपघातामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये (Pune Car Accident) कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी (Pune Police) कार चालकाला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एम जी रोडवर कारला भीषण अपघात झाला. भरधाव कारने 7 ते 8 वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 7 ते 8 वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये १ जण किरकोळ जखमी झाला आहे. त्याला जहांगिर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

कार चालवत असताना चालकाला अचानक फिट आली. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि या कारने 7 ते 8 दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणाला जास्त दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार चालकाला ताब्यात घेतले. अपघातामध्ये दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

Pune Car Accident
Bombay High Court: प्रियकराकडे पैसे मागणे गुन्हा नाही, न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

मुंबईतही ट्रकला भीषण अपघाताची घटना घडली आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला फ्री वेवर अपघात झाला. वडाळा परिसरात आंब्याचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. अचानक वळण घेताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि अपघात झाला. या अपघातामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर फ्री वेवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ट्राफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक हटवण्याचे काम सुरू आहे.

Pune Car Accident
Jitendra Awhad: दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सापडले भंगारजमा EVM, VIDEO पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर निशाणा

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये डंपर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव डंपरने प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरात धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा फाटा येथे हा अपघात झाला. अपघातातील जखमींना उपचारासाठी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीमध्ये ८ वृद्धांचा समावेश आहे. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही.

Pune Car Accident
Pune Crime News : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगूस; चौकातील लाईट बंद करून वाहनांची तोडफोड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com