Mumbai- Banglore Highway Traffic: Saamtv
मुंबई/पुणे

Maratha Reservation Protest: पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, मुंबई- बेंगळुरू महामार्ग ठप्प; वाहनांच्या १० किमीपर्यंत रांगा

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Maratha Reservation Protest Pune:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. कालपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अनेक ठिकाणी बसवर दगडफेक, तसेच राजकीय नेत्यांच्या घरांची जाळपोळ केल्याच्याही घटना घडल्या. आजही मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई - बेंगळोर महामार्ग रोखून धरला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुण्यातील नवले पुलाजवळ (Navale Bridge) मराठा आंदोलकांनी टायर जाळून आणि मुंबई- बेंगळुरू महामार्गावर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी संपूर्ण महामार्ग रोखून धरला.

मराठा बांधवांच्या आक्रमक पावित्र्यामुळे संपूर्ण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या ८ ते ९ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई- बेंगळुरू महामार्गावरुन अनेकजण सातारा, सांगली कोल्हापूरकडे प्रवास करत आहेत, तसेच अनेकजण मुंबईकडे जात आहेत, मात्र आंदोलकांनी गेल्या दोन तासांपासून महामार्ग रोखून धरल्याने प्रवासी आणि वाहन चालकांचे चांगलेच हाल होत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागपूर- पुणे महामार्गावरही रास्ता रोको...

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी आंदोलन, जाळपोळ होत असून बुलढाण्यात आज नागपूर- पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव मही येथ मराठा समाज आक्रमक झाला. अर्ध्या तासांपासून रास्ता रोको होत असल्याने यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी होत असून तत्काळ आरक्षण मिळावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT