Maharashtra Congress News Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'पक्षाने खूप काही दिलं; मतभेद बाजूला ठेऊन एकत्र या...' काँग्रेस प्रभारींचे कार्यकर्त्यांना आवाहन

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, पुणे|ता. २३ जानेवारी २०२४

Loksabha Election 2024:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस पक्ष तयारीला लागला आहे. आज पुण्यामध्ये कॉंग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. यावेळी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी मार्गदर्शन केले. तसेच आगामी निवडणूकांच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले.

मतभेद बाजूला ठेवून काम करण्याचे आवाहन...

"आपल्याकडे संघटन नाही येणाऱ्या निवडणूकांना आपल्याला समोरं जायचं आहे. म्हणून आज ही बैठक घेण्यातं आली. माझं सर्वांना आवाहन आहे सगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपपले मतभेत बाजूला ठेवून एकत्र येऊन कामं करण्याची वेळ आली आहे. याआधी गांधी आणि नेहरू यांच्या नेतृत्वाखाली आपण लढाई लढली आणि ती जिंकली. आपल्या सर्वांना एकजूट होऊन कामं करण्याची गरज आहे. पक्षाने आपल्याला खूप काही दिलेले आहे. आता पक्षाला आपल्याला काहीतरी देण्याची गरज आहे," असे आवाहन रमेश चेन्नीथला यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल..

"येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष निवडणूक लढणार की संघटनात्मक निवडणुका लढायच्या हे ठरवणे महत्वाचे आहे. बुथ कमिट्या निर्माण करणे गांभीर्याने घ्या. मोदी पक्षांच्या निवडणुका व्यक्ती केंद्रित करू पहात आहेत, आणि त्याला काही प्रमाणात यशही येत आहे," असे मत पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी व्यक्त केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन मुद्दा म्हणून कालचा इव्हेंट...

"आज एकाही लोकसभा मतदार केंद्रात भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता नाही. उगाच हा हिकडं जाणारं तो तिकडं जाणारं अश्या बातम्या पेरायचं काम सुरू आहे. त्यांच्यात निवडणूका घेण्याचे धाडस नाही, म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणुका घेतल्या जात नाही. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. 2014 ला मोदी यांनी निवडणूक आर्थिक विषयावर लढवली. 2019 ची निवडणूक राष्ट्रीय सुरक्षितेवरून लढवली. आता नवीन मुद्दा पाहिजे होता म्हणून कालचा इव्हेंट केला.." असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

वडेट्टीवारांची टीका...

"राम सत्तेसाठी वापरला जात आहे, राम आमच्या हृदयात आहे आणि ह्यांच्या मुखात राम आहे.. हे फक्त सत्तेसाठी राम वापरतात. पंतप्रधान आरोप करतात ह्यांनी 70 हजार कोटी खाल्ले आणि त्यांनाच सोबत सत्तेत बसवलं. राहुल गांधींना कसही रोखा, पण 2024 देशातील जनता तुम्हाला सत्तेपासून रोखल्याशिवाय राहणार नाही. एकट्या राहुल गांधी यांना सर्व जण घाबरत आहेत," अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT