NCP MLA Disqualification: कागदपत्रे गहाळ.. राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्वीस्ट; जितेंद्र आव्हाडांनी केला गौप्यस्फोट

Maharashtra NCP Crisis: सुनावणीच्या पहिल्या दिवशी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांकडून विविध प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
ncp crisis
ncp crisisSaam TV
Published On

रुपाली बडवे, मुंबई|ता. २३ जानेवारी २०२४

NCP MLA Disqualification:

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. सुनावणीच्या पहिल्या दिवशी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांकडून विविध प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या सुनावणीदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट..

राष्ट्रवादी सुनावणीदरम्यान अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीमधील अंतर्गत निवडणुका तसेच सत्तासंघर्षादरम्यान झालेल्या घटनांवर प्रश्न विचारले. यावेळी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? असा प्रश्न आव्हाडांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पक्षांतर्गत निवडणूका झाल्या होत्या. मात्र त्याची कागदपत्रे घाळ झाल्याचा मोठा गौप्यस्फोट केला.

"पक्षांतर्गत निवडणूका झाल्या होत्या. याची कागदपत्रे कपाटात ठेवण्यात आली होती. मात्र ज्यांच्यावर या कागदपत्रांची जबाबदारी होती, ते अजित पवार गटात गेले. त्यांनी या कागदपत्रांचे काय केले माहित नाही, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले. तसेच याची तपासणी करण्यासाठी मी माझ्या सहीच कोणतही पत्र पाठवले नाही. त्यामुळे त्याबाबत माहिती नाही," असाही दावा त्यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ncp crisis
Pune Lok Sabha Election: 'पुणे लोकसभेसाठी भाजपकडून १० जण इच्छुक...' संजय काकडेंचा दावा; यादीत कुणा कुणाची नावे?

सुनावणीत काय काय घडलं?

जूनच्या अखेर आणि जुलैच्या सुरुवातीला किती सदस्य शरद पवारांच्या (Sharad Pawar) समर्थनात होते? असा प्रश्न आव्हाडांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व ४५ सदस्यांचे जून अखेरीस शरद पवारांना समर्थन होते. जुलै २०२२ मध्ये ९ आमदारांनी शपथ घेतली. त्यापूर्वी १ जुलैला विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी समृद्धी महामार्गावरील अपघातप्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती.

त्यानंतर २५ जुलै निवडणूक आयोगाने पाठिंबा असणाऱ्या आमदारांच्या सह्यांचे तारीख नसलेले पत्र आम्हाला पाठवले. तोपर्यंत सगळे आमदार शरद पवारांच्या सोबत असल्याची आम्हाला माहिती होती, असे आव्हाड म्हणाले. (Latest Marathi News)

ncp crisis
Maratha Survey: महाराष्ट्रातही बिहारसारखा पॅटर्न वापरा, मराठा सर्वेक्षणावरून संभाजीराजे यांचं मोठं वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com